मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

पती-पत्नी (husband-wife)

नवरा-बायको या नातेवाचक शब्दांकरीता बोलींमध्ये जे वैविध्य आढळते त्यावरून भौगोलिक प्रदेश, कुटुंबव्यवस्थेतील दोघांचे स्थान, त्या त्या समाजाचा या नात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इत्यादी भाषाबाह्य गोष्टींवरही प्रकाश पडतो. नवरा, मालक, पती, साजन, घो, कारभारी, घरवाला, धनी, मिष्टर, नवरो, बवा,डवर, दाद्या, धाल्ला, दादला, घरना मानुस, घरचे, घरवालो, मरद, माटी, बायलस, गव, वहडस, वोडास, होडास, घोस, आदमी, म्हरलोक, हजबंड हे शब्द पती या नात्यासाठी तर बायको, बायकू, मिसेस, मालकीन, कुटुंब, पत्नी, बिऱ्हाड, घरकरीन, अर्धांगिनी, मिसेज, बाया, बायेल, बाय, बाईल, घरवाली, धर्मपत्नी, घरनी बाई, डोहाडी, फॅमिली, बाई, बायलस, ओढीस, होडीस, वोडीस, नवडी, वाईफ हे शब्द पत्नी या नात्यासाठी सापडले आहेत.