मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

प्रकल्पाबद्दल

मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण' हा डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ), पुणे आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांचा संयुक्त प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचा आणि तिच्या वैशिष्ट्यांचा डिजिटल स्वरूपाचा संग्रह तयार करणे हे ह्या प्रकल्पाचे उद्दिष्ट्य आहे.

पुढे वाचा...

प्रकल्पाच्या संकेतस्थळाचा निर्देश कसा करावा

प्रकल्पाच्या संकेतस्थळाचे उद्धरण खालीलप्रमाणे करावे:

‘सर्व्हे ऑफ डायलेक्ट्स ऑफ द मराठी लँग्वेज’ ओंनलाईन. भाषाशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ), पुणे आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई. https://www.sdml.ac.in , किंवा https://www.marathidialectsurvey.ac.in या संकेतस्थळावरून दि. १४.१२.२०१९ रोजी माहिती प्राप्त झाली.

आजचा शब्द/ आजची संकल्पना

फुलपात्र (Utensil used for drinking water)

‘पाणी पिण्याचे भांडे’ या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे.

वाटी, वाटकी, ग्लास, पेला, वाटका , भांडं, फुलपात्र, कप, कोप, करा, जांब, पेलो, वाटको, प्येला, प्याला, जग, फुलपातंर, लोट, तम्बालु, गलास, मग्गा, प्याली, संपुट, डवनं, झाकन, टम्बरेल, गडू, चंबू, बुटलं, येळणी, भगुनं, बऊल, डवला,कटोरा, गंजं, बटकी, डोवी, टापणो, चंबुलं, पंचपात्रं, बोळी, झाकनी, रामपात्रं, टिल्ली, दुदभांडं, दुदपात्रं, तवेली इ.

यांपैकी, जांब, पेलो, वाटको हे शब्द प्रामुख्याने कोल्हापूरमधील चंदगड तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि पालघर जिल्हा या ठिकाणी आढळून आले आहेत. संपुट हा शब्द धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सापडतो. येळणी हा शब्द केवळ लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा