मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

ब्लॉग

झाडू ३ ('जुन्या पद्धतीची घरे झाडण्यासाठी वापरण्यात येणारा झाडू')
28 October 2021

'जुन्या पद्धतीची घरे झाडण्यासाठी वापरण्यात येणारा झाडू' या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. साळूता, साऊता, साळता, साळाती, मोळ, मौळ, मोल, मोली, मोवाळ, मोयाळा, मोया, मोलझ़ाडू, मउल, मयेर, मयेरं, मयारू, मोऊळ, मोवळ, मोळा, मोळाची झ़ाडू, मोळवंडी, बुतारी, भुतारी, बुतारं, हालता, झाडणी, केरसुनी, शिराई, बहारा, शिराव, मांगाची शिराव, शिरावी, शिराय, शिरा, फडा, फळा, झाडणी, झ़ाडणी, झान्नी, झाडनी, झ़ाळन्नी, झ़ान्नी, केरकाढणी, लोटना, बाहरी, बहारी, बाहारी, बायरं, बायरी, बाइरी, बाहारी, बोहरी वहारी, वाहरी, भारा, भारी, भारं, भारो, भाहरी, बुहारी, बुआरी, भाडी, बाडी, बायडी,पिसोळी,सारन, सान, सुनी, खराटा, खर्हाटी, खरोटा, खराटो, कुंच़ा, कुंचा, कुच्ची, कुच्या, कुचा इ. या वैविध्याचे भौगोलिक आणि सामाजिक विवरण पुढीलप्रमाणे.

नवऱ्याचा मामा (husband’s mother’s brother)
28 October 2021

‘आईची मोठी बहीण’ आणि ‘आईची लहान बहीण’ या नात्याकरता महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत कमी-अधिक प्रमाणात वैविध्य आढळून येते. मावशी हा नातेवाचक शब्द महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सर्रास वापरला जातो. त्याचप्रमाणे सदर सर्वेक्षणात या संकल्पनेकरता माउशी, माशी, मोसी, मोठी आई, खाला, जिजी, धाकली, आईमोठी, आई, आईस, धाकलीस, वाडय, आया, मोठास, बाईल, मोठी माऊशी, फुई, मोठ्या आस, मोठी माय, जिजीस, मम्मी, बडीमम्मी, मोठी आयो, आजली, आजीबाई, वाडाई, जिज़ा, काकू, फुईस, मयती, हिरमा, आंटी, धोडावा, मोठीमम्मी, ढालाई, मोठी मा, मालपी, मॉसी. इ. वैविध्य महाराष्ट्रातील मराठीच्या विविध बोलीत आढळून आले.

आईची मोठी बहीण आणि आईची लहान बहीण
28 October 2021

‘आईची मोठी बहीण’ आणि ‘आईची लहान बहीण’ या नात्याकरता महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत कमी-अधिक प्रमाणात वैविध्य आढळून येते. मावशी हा नातेवाचक शब्द महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सर्रास वापरला जातो. त्याचप्रमाणे सदर सर्वेक्षणात या संकल्पनेकरता माउशी, माशी, मोसी, मोठी आई, खाला, जिजी, धाकली, आईमोठी, आई, आईस, धाकलीस, वाडय, आया, मोठास, बाईल, मोठी माऊशी, फुई, मोठ्या आस, मोठी माय, जिजीस, मम्मी, बडीमम्मी, मोठी आयो, आजली, आजीबाई, वाडाई, जिज़ा, काकू, फुईस, मयती, हिरमा, आंटी, धोडावा, मोठीमम्मी, ढालाई, मोठी मा, मालपी, मॉसी. इ. वैविध्य महाराष्ट्रातील मराठीच्या विविध बोलीत आढळून आले.

मुलगा-मुलगी
28 October 2021

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘स्वत:चा मुलगा-मुलगी’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात पुढीलप्रमाणे वैविध्य आढळते. मुलगा-मुलगी, पोरगा-पोरगी, ल्योक-लेक, लेकुस-लेकीस, पोयरो-पोयरी, डिकरा-डिकरी, आंडोर-आंडेर, पोशा-पोशी, टुरा-टुरी, बेटा-बेटी, चेडो-चेडु, छोकरा-छोकरी, छोरा-छोरी, छोकरो-छोकरी, छोरो-छोरी, झिल-चेडु, पोट्टं-पोट्टी, पुतुस-धुवस, पुराय-पोरीयो, सोहरा-सोहरी, कारटं-कारटी, लेकरू-लेकरी, हप्पा-निगरी इ. शब्द आढळतात. तसेच याशिवाय मुलगा या संकल्पनेसाठी पोर्‍या, भुरगे, चिरंजीव तर मुलगी या संकल्पनेसाठी पोर, पोरी, बाय, ताराई, कुंजाई इ. शब्द दिसून येतात. लेक आणि पोर हे शब्द कमी अधिक प्रमाणात मुलगा आणि मुलगी दोन्ही संकल्पनांसाठी दिसून येतात. या शब्दांच्या वापरामध्ये असणारे भौगोलिक आणि सामाजिक वैविध्य पुढे विस्ताराने पाहू. मुलगा-मुलगी हे शब्द संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मुलासाठी मुलगो, मुलगं, मुला, मुले, मगा, मुलगे, आणि मुलगा हे तर मुलीसाठी मुली, मगलो आणि मुलगी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. मुलगो हे ध्वन्यात्मक वैविध्य मुलासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असणारा चंदगड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याला लागून असणारा राधानगरी तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवली या गावात आढळते. मगा-मगलो हे ध्वन्यात्मक वैविध्य सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजात मिळाले आहे. पोरगा-पोरगी हे शब्द संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मुलासाठी पोरगा, पोरगं, पोरगे, पोरगो, पोहा, पोर, पोरा, पॉर, प्वार, पुरय इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तर मुलीसाठी पोरगी, पुरगी, पॉरॉ, पोरघी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. पोरगो हा शब्द सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात तसेच वर्धा, रायगड, आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आढळून आला आहे. पोहा हा शब्द पालघर जिल्ह्यातील धोडी आणि दुबळा या समाजातील भाषकांकडून मिळाला आहे. प्वार, प्वारगा, प्वारगो हे शब्दवैविध्य अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळून आले आहे. मुलासाठी पोर हा शब्द पालघर जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळून आला आहे. कोल्हापूर, सोलापूर, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, नंदुरबार, जालना, आणि वर्धा या जिल्ह्यांत या शब्दाचे प्रमाण तुरळक आहे. मुलासाठी पोर्‍या हा शब्द साधारणत: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. तर रत्नागिरी जिल्ह्यातही हा शब्द तुरळक प्रमाणात मिळाला आहे. औरंगाबाद, आणि जालना जिल्ह्यात केवळ भिल्ल समाजात, नागपूर जिल्ह्यामध्ये कोष्टी समाजात तसेच अमरावती जिल्ह्यामध्येदेखील हा शब्द दिसून आला आहे. पोर हा शब्द मुलीसाठीही दिसून येतो. रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर अहमदनगर, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून येतो.

वडिलांचा मोठा आणि छोटा भाऊ आणि वडिलांच्या मोठ्या आणि छोट्या भावाची बायको
28 October 2021

वडिलांचा मोठा भाऊ आणि वडिलांच्या मोठ्या भावाची बायको या दोन नात्यांना महाराष्ट्रातील विविध प्रदेशात शब्दवैविध्य दिसून येते. वडिलांचा मोठा भाऊ या नात्याला च़ुलता, काका, मोठा बाबा, मोठे वडील, मोठा बापू, मोठा बाप, म्हालपा, बाबास, वडाओ, ढाल बाबा, मोठा पप्पा, खबा, वडलो तिती, मोठा आबा, चाचा, अंकल, मोटे पिताजी, बडो बाप, बडे अब्बा, आजलो, भावला, आजोबा इ. शब्द वापरले जातात. तसेच वडिलांच्या मोठ्या भावाच्या बायकोला च़ुलती, काकी, मोठी आई, मोठी बाय, धोडावा, तिती माय, मोठी मा, म्हालपी, चाची, बडी अम्मी, मोटी मम्मी, आंटी, मावशी, भावलानीस, आजी ई. शब्द वापरले जातात. वडिलांचा मोठा भाऊ हा वडिलांपेक्षा वयाने मोठा असल्या कारणाने मोठा हे विशेषणाचा वापर करून मोठा बाप किंवा मोठा वडिल असे शब्द वापरले जातात. अशाच प्रकारे मोठ्या आईच्या बाबतीतही होते.