मराठी बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

अपादान

डाउनलोड अपादान

नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

अपादान

{अपादान}

वाक्यातील क्रियेचा वियोग बिंदू/आरंभ बिंदू दर्शविणार्‍या वाक्यातील नामाचा आणि क्रियापदाचा परस्पर संबंध दर्शविणारा कारकसंबंध म्हणजे ‘अपादान’. उदा : ‘बस सातार्‍याहून निघाली’ या वाक्यात ‘निघणे’ या क्रियेचा आरंभ बिंदू ‘सातारा’ हे नाम दर्शविते. प्रमाण मराठीत आरंभ बिंदूचा निर्देश पंचमी विभक्तीची [-ऊन/हून्]’ ही प्रत्ययी रूपे करतात.



१.0 व्याकरणिक विशेषाची नोंद

मराठीच्या विविध बोलींमध्ये अपादान कारकासाठी ११ पर्यायी रूपे आढळली आहेत :



(१) [-ऊन् न/हून्], (२) [-सून्/स्नं], (३) [-शी/शे/सी/से], (४) [-इन्/इ], (५) [-नी], (६) [-ने], (७) [-सन/स], (८) [-च़न्], (९) [-ऊन्शान्], (१०) [-ऊन्शी], (११) [-चि/चिन्]. अपादान कारकासाठी सापडलेल्या या पर्यायी रूपांचा भौगोलिक आणि सामाजिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.

१.१ पर्यायी रूप १ : [-ऊन्/न/हून्]

अपादान या कारकासाठी [-ऊन्/न/हून्] हे पर्यायी रूप राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सापडले.

१.१.१ उदाहरण (जि. गडचिरोली, ता. कोरची, गाव मोहगाव, पु३९, एस.सी., १२वी)

एका थैलीतून त्यानी काइतरी वस्तू काढली
eka tʰəilitun tyani kaitəri wəstu kaḍʰli
ek-a tʰəili-t-un tya-ni kaitəri wəstu kaḍʰ-l-i
one-OBL bag-LOC-ABL he.OBL-ERG something thing.3SGF draw-PFV-3SGF
He took something out from the bag.

१.१.२ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. मालवण, गाव देऊळवाडा, पु५२, ब्राह्मण)

मालवनहून रेवडीक ज़ायच़ो रात्रीच्या वेळी
malwənhun rewḍik jayco ratriča weḷi
malwən-hun rewḍi-k ja-(a)yco ratri-č-a weḷ-i
Malwan-ABL Rewdi-LOC go-PST.HAB.1PL night.OBL-GEN-OBL time-LOC
(We) used to go from Malvan to Revdi at night.

१.१.३ उदाहरण (जि. कोल्हापूर, ता. चंदगड, गाव चंदगड, पु३०, परीट, ११वी)

तेनं आपल्या पिशवीतनं पुस्तक काडल्यान
tenə aplya pišwit pustək kaḍlyan
te-nə ap-l-ya pišwi-t- pustək kaḍ-l-yan
he.OBL-ERG we.SELF-GEN-OBL bag-LOC-ABL book.3SGN draw-PFV-3SG
He took a book out from his bag.

१.२ पर्यायी रूप २ : [-सून्/स्नं)]

अपादान या कारकासाठी [-सून्/स्नं] हे पर्यायी रूप राज्यातील चार जिल्ह्यांत आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :

जिल्हे तालुका व गाव
सिंधुदुर्ग दोडामार्ग - आयी व माटणे, मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - मानगाव व कुडाळ, वेंगुर्ला - वेंगुर्ला, देवगड - तारामुंबरी व जामसंडे, वैभववाडी - नादवडे, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे
कोल्हापूर कागल - गोरंबे व केनवडे, चंदगड - चंदगड आणि कोदाळी
सांगली मिरज - म्हैसाळ (मराठा)
पालघर वसई - वाघोली (पाचकळशी वाडवळ समाज)


१.२.१ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. मालवण, गाव दांडीप्रभा, स्त्री५५, गाभीत, ७वी)

काय काडता बॅगेसून
kay kaḍta bæɡesun
kay kaḍ-ta bæɡ-e-sun
what take-PRS.PROG.3SG bag-OBL-ABL
What is (he) removing from the bag?

१.२.२ उदाहरण (जि. कोल्हापूर, ता. चंदगड, गाव चंदगड, स्त्री५१, एस.सी., १ली)

दोगं बहिनभावंडं मुलगीबी अन तो मुलगाबी शाळेस्नं आली
doɡə bəhinbʰawəṇḍə mulɡibi ən to mulɡabi šaḷesnə ali
doɡə bəhinbʰawəṇḍə mulɡi-bi ən to mulɡa-bi šaḷe-snə a-l-i
both.3PL siblings girl.3SGF-PRT and DEM.DIST.3SGM boy.3SGM PRT school.OBL-ABL come-PFV-3PL
The boy and the girl (siblings) came from school.

१.३ पर्यायी रूप ३ : [-शी/शे/सी/से]

अपादान या कारकासाठी [-शी/शे/सी/से] हे पर्यायी रूप राज्यातील पाच जिल्ह्यात आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत:

जिल्हे तालुका व गाव
रत्नागिरी रत्नागिरी - झाडगाव (मुस्लिम समाज), खेड - बहिरवली (मुस्लिम समाज)
रायगड कर्जत - गौळवाडी व साळोख, अलिबाग - मांडवा व बापळे, रोहा - नागोठणे, मुरूड - एकदरा, श्रीवर्धन - बागमांडला, महाड - नरवण
ठाणे अंबरनाथ - उसाटणे (बौद्ध समाज), मुरबाड - पाटगाव (आगरी समाज)
पालघर डहाणू - मुरबाड (मल्लार कोळी समाज) व पिंपळशेत (वारली समाज), तलासरी - उधवा व गिरगाव (वारली समाज)
नागपूर रामटेक - करवाही (गोंड समाज)


१.३.१ उदाहरण (जि. ठाणे, ता. अंबरनाथ, गाव उसाटणे, पु१९, बौद्ध, एफ.वाय.)

आमाला कल्यानवरशी हितं उसाटन्याला येताना एवडं म्हंजे घाम फुटलेला
amala kəlyanwərši
hitə usaṭnyala yetana ewḍə mʰəñǰe ɡʰam pʰuṭlela
ama-la kəlyan-wər-ši hitə usaṭnya-la ye-tana ewḍə mʰəñǰe ɡʰam pʰuṭ-lel-a
we.EXCL-DAT Kalyan-PP.LOC-ABL here Usatane.OBL-LOC come-IPFV this much.3SGN means sweat.3SGM break-PLU.PFV-3SGM

We were sweating so much while coming from Kalyan to Usatane.

१.३.२ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. खेड, गाव बहिरवली, पु५८, मुस्लिम, ९वी)

म दुबईशे अइलो म पुन्ना सौदीला गेलो
mə dubəiše əilo mə punna səudila ɡelo
mə dubəi-še əi-l-o mə punna səudi-la ɡe-l-o
then Dubai-ABL come-PFV-1SGM then again Saudi-LOC go-PFV-1SGM
I came from Dubai and then went back to Saudi.
१.३.३ उदाहरण (जि. पालघर, ता. तलासरी, गाव उधवा, पु३०, वारली, बी.कॉम.)

त्या च़ित्रावरसी समज़ायच़ा
tya citrawərsi səmjayca
tya citr-a-wər-si səmj-ayca
DEM.DIST.OBL picture-OBL-PP.LOC-ABL understand-NON.FIN
It can be understood from that picture.
१.३.४ उदाहरण (जि. पालघर, ता. तलासरी, गाव उधवा, पु३०, वारली, बी.कॉम.)

तेवरसे समज़ून ज़ायच़ा
tewərse səmjun jayca
te-wər-se səmj-un ja-(a)yca
that-PP.LOC-ABL understand-CP go-NON.FIN
It can be understood from that.

१.४ पर्यायी रूप ४: [-इन्/इ]

अपादान कारकासाठी [-इन्/इ] हा पर्याय राज्यातील पाच जिल्ह्यांत सापडला. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत:

जिल्हे तालुका व गाव
जळगाव चाळीसगाव - दहिवद (मराठा समाज)
धुळे धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे
नंदुरबार नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा
नाशिक मालेगाव - कळवाडी (चांभार समाज), सटाणा - दरेगाव (महार समाज)


१.४.१ उदाहरण (जि. नंदुरबार, ता. नवापूर, गाव खांडबारा, स्त्री५०+, एस.सी, अशिक्षित)

मास्तरनी थैलीमाइन काय काडं सपरचन
mastərni tʰəilimain kay kaḍə səpərčən
mastər-ni tʰəili-ma-in kay kaḍ-ə səpərčən
teacher-ERG bag-LOC-ABL what take-PFV.3SGN apple.3SGN
A teacher took an apple out from the bag.
१.४.२ उदाहरण (जि. नंदुरबार, ता. नंदुरबार, गाव घोटाणे, स्त्री२६, ओबीसी, ८वी)

एक मानूस पिशवीम सपरचंद काडा
ek manus pišwiməi səpərčənd kaḍa
ek manus pišwi-mə-i səpərčənd kaḍ-a
one man bag-LOC-ABL apple.3SGM take-PFV.3SGM
A man took an apple out from the bag.

१.५ पर्यायी रूप ५: [-नी]

अपादान या कारकासाठी [-नी] हा पर्याय राज्यातील पाच जिल्ह्यांत आढळला. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत:

जिल्हे तालुका व गाव
कोल्हापूर चंदगड - कोदाळी
रत्नागिरी रत्नागिरी - झाडगाव
पालघर वसई - वाघोली (ख्रिश्चन समाज)
जालना जालना - धावेडी
वाशिम वाशिम - शिरपुटी कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक)


१.५.१ उदाहरण (जि. वाशिम, ता. कारंजा, गाव गिरडा, पु७५, कुणबी, १०वी)

शेतातनी आपलं दुपारी घरी येतो जेवन खावन करतो
šetatni aplə dupari ɡʰəri yeto jewən kʰawən kərto
šet-a-t-ni ap-l-ə dupar-i ɡʰər-i ye-t-o jewən kʰawən kər-t-o
farm-OBL-LOC-ABL we.SELF-GEN-3SGN afternoon-LOC home-LOC come-IPFV-1SGM meal REDUP do-IPFV-1SGM
I come from the farm in the afternoon and have lunch.

१.६ पर्यायी रूप ६: [-ने]

अपादान या कारकासाठी [-ने] हा पर्याय राज्यातील केवळ पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामधील वाघोली गावातील ख्रिश्चन आणि सामवेदी ब्राह्मण समाजात आढळला.

१.६.१ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव वाघोली, पु५९, सामवेदी ब्राह्मण, ११वी)

माहीम ते बॅन्ड्रातने यहापरेन पायी ज़ासो
mahim te bæṇḍratne yəhapəren payi jaso
mahim te bæṇḍra-t-ne yəhapəren pay-i ja-(a)s-o
Mahim to Bandra-LOC-ABL here.until foot-INS go-PST.HAB-3SGM
We used to walk from Mahim to Bandra.

१.७ पर्यायी रूप ७: [-सन/स]

अपादान या कारकासाठी [-सन/स] हे पर्यायी रूप राज्यातील केवळ पालघर जिल्ह्यातील वाघोली (ता. वसई) गावामधील सामवेदी ब्राह्मण समाज आणि बोर्डी (ता. डहाणू) गावातील वाडवळ तसेच मांगेला समाजांत आढळले.
१.७.१ उदाहरण
(जि. पालघर, ता. डहाणू, गाव बोर्डी, स्त्री५८, वाडवळ, १०वी)

पिशवीसन सपरचन काडलं
pišwisən səpərčən kaḍlə
pišwi-sən səpərčən kaḍ-l-ə
bag-ABL apple.3SGN draw-PFV-3SGN
(He) took an apple out of the bag.
१.७.२ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव वाघोली, पु५९, सामवेदी ब्राह्मण, ११वी)

पिशवीसं सपरचन काडला टेबलोर ठुइला
pišwi səpərčən kaḍla ṭeblor ṭʰuila
pišwi- səpərčən kaḍ-l-a ṭeblo-r ṭʰui-l-a
bag-ABL apple.3SGM draw-PFV-3SGM table-PP.LOC keep-PFV-3SGM
(He) took an apple out of the bag and kept it on the table.

१.८ पर्यायी रूप ८: [-च़न्]

अपादान या कारकासाठी [-च़न्] हे पर्यायी रूप राज्यातील केवळ पालघर जिल्ह्यामधील बोर्डी (ता. डहाणू) गावातील वाडवळ समाजात आढळले.

१.८.१ उदाहरण (जि. पालघर, ता. डहाणू, गाव बोर्डी, स्त्री५८, वाडवळ, १०वी)

बॅगेच़न पुस्तक काडलं
bæɡecən pustək kaḍlə
bæɡ-e-cən pustək kaḍ-l-ə
bag-OBL-ABL book draw-PFV-3SGN
He took a book out from the bag.

१.९ पर्यायी रूप ९: [-ऊन्शान्]

अपादान या कारकासाठी [-ऊन्शान्] हे पर्यायी रूप केवळ पालघर जिल्ह्यात बोर्डी (ता. डहाणू) गावातील वाडवळ आणि माळी (सोमवंशी क्षत्रीय) समाजात आढळले.

१.९.१ उदाहरण (जि. पालघर, ता. डहाणू, गाव बोर्डी, स्त्री२७, माळी (सोमवंशी क्षत्रिय), एम.ए.,डि.एड.)

पिशवीमूनशान हपरचन काडलं
pišwimunšan həpərčən kaḍlə
pišwi-m-unšan həpərčən kaḍ-l-ə
bag.OBL-LOC-ABL apple.3SGN draw-PFV-3SGN
(He) took an apple out from the bag.

१.१० पर्यायी रूप १०: [-ऊन्शी]

अपादान या कारकासाठी [-ऊन्शी] हे पर्यायी रूप राज्यातील केवळ पालघर जिल्ह्यातील पिंपळशेत (ता. डहाणू) गावातील वारली समाजात आढळले.

१.१०.१ उदाहरण (जि. पालघर, ता. डहाणू, गाव पिंपळशेत, पु४५, वारली, ८वी)

गवत अथून्शी पालघरला नेत
ɡəwət ətʰunši palɡʰərla net
ɡəwət ətʰ-unši palɡʰər-la ne-t
grass here-ABL Palghar-LOC take-PST.HAB
(We) used to carry grass from here to Palghar.

१.११ पर्यायी रूप ११ : [-ची/चिन्]

अपादान या कारकासाठी [-ची/चिन्] हे पर्यायी रूप राज्यातील केवळ पालघर जिल्ह्यात गिरगाव (ता. तलासरी) गावातील वारली समाजात आढळले.

१.११.१ उदाहरण (जि. पालघर, ता. तलासरी, गाव गिरगाव, पु५५, वारली, ८वी)

बॅगेचिन् डबा काढला
bæɡečin ḍəba kaḍʰla
bæɡ-e-čin ḍəba kaḍʰ-l-a
bag-OBL-ABL box.3SGM draw-PFV-3SGM
He took a tiffin box out of the bag.
१.११.२ उदाहरण (जि. पालघर, ता. तलासरी, गाव गिरगाव, पु२३, वारली, बी.एस.सी.)

चर्वेची गलासात ओतून दिला
cərweči ɡəlasat otun dila
cərwe-či ɡəlas-a-t ot-un di-l-a
jug.OBL-ABL glass-OBL-LOC pour-CP give-PFV-3SGM
(He) poured (the water) from the jug into the glass.