‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण’ या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे! डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ), पुणे आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त प्रकल्पातून उपलब्ध झालेल्या भाषा सामग्रीवर हे संकेतस्थळ आधारित आहे. या प्रकल्पाची दोन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत - मराठी भाषेतील भौगोलिक भेदांचा भाषावैज्ञानिक अभ्यास करण्याच्या दृष्टीने उपयोगी असा एक मुक्तस्रोत digital database उपलब्ध करुन देणे; तसेच मराठीतील बोलीभेद निश्चित करण्याच्या दृष्टीने निवडक शब्द आणि व्याकरणिक विशेषांच्या आधारावर विश्लेषण प्रस्तुत करणे. हे विश्लेषण भाषिक नकाशांच्या स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे.