नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. व्याकरणिक विशेष : {संबंध- तृतीय पुरुष एकवचन}
वाक्यातील दोन नामांमधील संबंध दर्शविण्याकरिता षष्ठी विभक्तीचा उपयोग केला जातो. ‘हे त्याच़ं/रमेशच़ं घर आहे’ या प्रमाण मराठीतील वाक्यात [-च़-] हा तृतीय पुरुष एकवचन विभक्ती प्रत्यय ‘तो/रमेश’ आणि ‘घर’ या नामांमधील संबंध दर्शवितो.
१.0 व्याकरणिक विशेषाची नोंदसर्वेक्षणातून संबंधवाचक तृतीय पुरुष एकवचन विभक्ती प्रत्ययाची मराठीच्या बोलींमध्ये चार पर्यायी रूपे मिळाली : (१) [-च़/च-]; (२) [-न-]; (३) [-स्वर आ/इ/ओ/Ø]; (४) [-ह-]. या पर्यायी रूपांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
१.१ पर्यायी रूप १ : [-च़/च-] संबंध-तृतीय पुरुष एकवचन विभक्ती प्रत्ययाकरता [-च़/च-] हे रूप राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळले. १.१.१ उदाहरण (जि. पुणे, ता. मुळशी, गाव निवे, पु१८, मराठा, १२वी) एक राजा आसतो आनि त्याच़ं म्हजे राज्य आसतं ek raǰa asto ani tyacə mʰəǰe raǰyə astə ek raǰa as-t-o ani tya-c-ə mʰəǰe raǰyə as-t-ə one king.3SGM be-IPFV-3SGM and he.OBL-GEN-3SGN means kingdom.3SGN be-IPFV-3SGN There was a king and he had a kingdom. १.२ पर्यायी रूप २ : [-न-]संबंध-तृतीय पुरुष एकवचन विभक्ती प्रत्ययासाठी [-न-] हे रूप राज्यातील केवळ जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आढळले आहे. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
जळगाव | जळगाव - धामणगाव व वडली, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा- तांदळवाडी व वैजापूर |
धुळे | धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा |
नाशिक | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव, सुरगणा - काठीपाडा |
पालघर | डहाणू - वेती (कातकरी समाज) |
रायगड | कर्जत - साळोख (कातकरी), रोहा - चिंचवली (कातकरी), महाड - भेलोशी (कातकरी) |
संबंध-तृतीय पुरुष एकवचन विभक्ती प्रत्ययाकरता [-स्वर आ/इ/ओ/Ø] हे पर्यायी रूप केवळ बुलढाणा (तुरळक प्रमाण) आणि पालघर जिल्ह्यांत (जास्त प्रमाण) आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
बुलढाणा | शेगाव - पडसूळ (बौद्ध समाज) |
पालघर | वसई - वाघोली (सामवेदी ब्राह्मण समाज, ख्रिश्चन/ख्रिश्चन कॅथलिक आणि वाडवळ/पाचकळशी वाडवळ), कळंब (मांगेला/मांगेला ओबीसी समाज) व निर्मळ (रोमन कॅथलिक सामवेदी समाज), मोखाडा - कारेगाव (म ठाकूर) |
संबंध-तृतीय पुरुष एकवचन विभक्तीचे प्रत्ययाकरता [-ह-] हे पर्यायी रूप केवळ पालघर जिल्ह्यात आढळले. या पर्यायाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत:
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
पालघर | वसई - वाघोली (सामवेदी ब्राह्मण समाज), निर्मळ (रोमन कॅथलिक सामवेदी समाज) व कळंब (मांगेला ओबीसी समाज), डहाणू - बोर्डी (वाडवळ समाज), तलासरी - उधवा (वारली समाज) |