मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

करण

डाउनलोड करण

नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

व्याकरणिक विशेष : {करण}

वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक साधनाचा निर्देश करणारे नाम आणि वाक्यातील क्रियापद यांच्यातील परस्पर संबंध ‘करण’ या कारकाद्वारे दर्शविला जातो. उदा: ‘मुलाने सापाला काठीने मारले’ या वाक्यातील ‘मारणे’ या क्रियेसाठी ‘काठी’ या साधनाचा उपयोग झाला आहे. प्रमाण मराठीत साधनाचा निर्देश [-ने/नी/नं] या विभक्ती प्रत्ययाने होतो.
१.० व्याकरणिक विशेषाची नोंद

मराठीच्या विविध बोलींमध्ये करण या कारकासाठी ८ पर्यायी रूपे आढळली आहेत :


(१) [-ने/नी/न/न्/ना/नु], (२) [-वरी/वर], (३) [-खल/खालं/खाली/खाले/खाल्], (४) [-घई/घी], (५) [-शी], (६) [-खन/खुन/कन], (७) [-कडं/कड्/क/कर्/करी], (८) [-स्वर इ/ए/अ]. करण या कारकासाठी सापडलेल्या प्रत्ययांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
१.१ पर्यायी रूप १ : [-ने/नी/न/न्/ना/नु]

करण या कारकासाठी [-ने/नी/न/न्/ना/नु] हे पर्यायी रूप राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सापडले.


१.१.१ उदाहरण
(जि. पुणे, ता. जुन्नर, गाव बोरी बुद्रुक, स्त्री६५, फुलमाळी, अशिक्षित)

सुरीने कापताय सपरचन का काय
surine kaptay səpərčən ka kay
suri-ne kap-tay səpərčən ka kay
knife-INS cut-PRS.PROG apple.3SGN DM what
He is cutting the apple with a knife.


१.२ पर्यायी रूप २ : [-वरी/वर]

करण या कारक संबंधांचा निर्देश करण्यासाठी [-वरी/वर] हे पर्यायी रूप राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक आणि सामाजिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :जिल्हे तालुका व गाव
बुलढाणा जळगाव-जामोद - वडगाव पाटण (माळी समाज)
जळगाव जळगाव - धामणगाव, चाळीसगाव - दहिवद, चोपडा - तांदळवाडी
धुळे धुळे - सोनगीर, खेडे व शिरूड-खोरदड, शिरपूर - आंबे व शिंगावे, साक्री - दिघावे व धाडणे
नंदुरबार नंदुरबार -घोटाणे व धानोरा, नवापूर - चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा
नाशिक मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव
पालघर डहाणू - बोर्डी (मांगेला समाज)
सातारा वाई - पांडेवाडी (नवबौद्ध समाज)


१.२.१ उदाहरण (जि. धुळे, ता. शिरपूर, गाव आंबे, स्त्री५५, माळी, ५वी)

कापी र्‍हायनात त्या चाकूवरी
kapi rʰaynat tya cakuwəri
kap-i rʰaynat tya caku-wəri
cut-CP STAY.PSR.PROG.3PL DEM.DIST.OBL knife-INS
They are cutting (something) with a knife.१.३ पर्यायी रूप ३ : [-खल/खालं/खाली/खाले/खाल्]

करण या कारकासाठी [-खल/खालं/खाली/खाले/खाल्] हे पर्यायी रूप चार जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक आणि सामाजिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :जिल्हे तालुका व गाव
रायगड कर्जत - साळोख (कातकरी समाज), रोहा - चिंचवली (कातकरी समाज), महाड - नरवण-भेलोशी (कातकरी समाज)
ठाणे मुरबाड - मढ (ठाकूर समाज)
पालघर वसई - सायवन (मल्हार कोळी समाज), डहाणू - बोर्डी (वारली समाज), मुरबाड+पिंपळशेत (मल्हार कोळी आणि वारली समाज) व वेती (कातकरी समाज), तलासरी - उधवा (वारली समाज) व गिरगाव (वारली समाज), जव्हार - हातेरी (क ठाकूर आणि वारली) व खंबाळा (कोकणा समाज), मोखाडा - दांडवळ (वारली समाज)
नाशिक त्र्यंबकेश्वर - गोलदरी (महादेव कोळी समाज)


१.३.१ उदाहरण (जि. पालघर, ता. डहाणू, गाव पिंपळशेत, पु२४, वारली, ६वी)

त्याच्या दिलं हाताखल
tyača dilə hatakʰəl
tya-č-a di-l-ə hat-a-kʰəl
he.OBL-GEN-OBL give-PFV-3SGN hand-OBL-INS
He hit him with (his) hand.

१.४ पर्यायी रूप ४ : [-घई/घी]

करण या कारक संबंधांचा निर्देश करण्यासाठी [-घई/घी] हे पर्यायी रूप राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सापडले. या पर्यायाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :जिल्हे तालुका व गाव
नाशिक मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव
धुळे धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे
नंदुरबार नंदुरबार - घोटाणे, नवापूर - खांडबारा, शहादा - शहादा


१.४.१ उदाहरण (जि. धुळे, ता. धुळे, गाव लळींग, पु२९, महार, एफ.वाय.)

हातघइ पाडी त्यानी खाली
hatɡʰəi paḍi tyani kʰali
hat-ɡʰəi paḍ-i tya-ni kʰali
hand-INS drop-PFV.3SGF he.OBL-ERG down
He dropped (the bottle) with (his) hand.१.५ पर्यायी रूप ५ : [-शी]

करण या कारकासाठी [-शी] हे पर्यायी रूप राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक आणि सामाजिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :जिल्हे तालुका व गाव
रायगड कर्जत - साळोख (कातकरी समाज)
ठाणे अंबरनाथ - उसाटणे (आगरी समाज)
पालघर डहाणू - मुरबाड+पिंपळशेत (वारली समाज), तलासरी - उधवा (वारली समाज), वसई - सायवन (कातकरी)


१.५.१ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव सायवन, पु२६, कातकरी, ४थी)

हातरूमालशी नाक पुसलं
hatrumalši nak puslə
hatrumal-ši nak pus-l-ə
handkerchief-INS nose wipe-PFV-3SGN
(He) wiped his nose with a handkerchief.१.६ पर्यायी रूप ६ : [-खन/खुन/कन]

करण या कारक संबंधांचा निर्देश करण्यासाठी [-खन/खुन/कन] हे पर्यायी रूप राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक आणि सामाजिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :जिल्हे तालुका व गाव
रत्नागिरी रत्नागिरी - झाडगाव (भंडारी समाज)
रायगड रोहा - चिंचवली (कातकरी समाज)
नाशिक त्र्यंबकेश्वर - गोलदरी (महादेव कोळी)
जळगाव रावेर - निरूळ (गुजर समाज)


१.६.१ उदाहरण (जि. जळगाव, ता. रावेर, गाव निरुळ, स्त्री३५, गुजर, एच.एस.सी)

पेनकन तोडून टाकला फोडून टाकला
penkən toḍun ṭakla pʰoḍun ṭakla
pen-kən toḍ-un ṭak-l-a pʰoḍ-un ṭak-l-a
pen-INS break-CP THROW-PFV-3SGM break-CP THROW-PFV-3SGM
He burst (the balloon) with a pen.


१.७ पर्यायी रूप ७: [-कडं/कड्/क/कर्/करी]

करण या कारक संबंधांचा निर्देश करण्यासाठी [-कडं/कड्/क/कर्/करी] हे पर्यायी रूप राज्यातील तीन जिल्ह्यात सापडले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक आणि सामाजिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :जिल्हे तालुका व गाव
रायगड कर्जत - साळोख (कातकरी)
पालघर जव्हार - हातेरी (वारली आणि क ठाकूर समाज), मोखाडा - दांडवळ (वारली समाज)
नंदुरबार शहादा - प्रकाशा (भिल्लं समाज)


१.७.१ उदाहरण (जि. पालघर, ता. जव्हार, गाव हातेरी, पु२५, क ठाकुर, बी.ए.)

पेनाकडं चित्र काडतोय
penakəḍə čitrə kaḍtoy
pen-a-kəḍə čitrə kaḍ-toy
pen-OBL-INS picture.3SGN draw-PRS.PROG.3SGM
He is drawing a picture with a pen.१.८ पर्यायी रूप ८ : [-स्वर इ/ए/अ]

करण या कारकासाठी [-स्वर इ/ए/अ] हे पर्यायी रूप केवळ पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधील वाघोली गावातील सामवेदी ब्राह्मण समाजात व कळंब गावातील मांगेला समाजात तसेच डहाणू तालुक्यातील मुरबाड व पिंपळशेत (वारली आणि मल्हार कोळी) या ठिकाणी आढळले.१.८.१ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव कळंब, स्त्री२८, मांगेला, १२वी)

वानकटा मारीन किंवा चपलाने मारीन
wankəṭa-i mar-in kinwa čəpla-ne mar-in
wankəṭa-i mar-in kinwa čəpla-ne mar-in
slipper.PL.OBL-INS hit-FUT.1SG or slipper.OBL-INS hit-FUT.1SG
I will hit (you) with a slipper or footwear.१.८.२ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव कळंब, पु८०, मांगेला, बी.ए.)

आता सपरचंद त्या पिशविनी काढलं का न तोंडा खाल लागलाय
ata səpərčənd tya pišwini kaḍʰlə ka nə toṇḍai kʰal laɡlay
ata səpərčənd tya pišwi-ni kaḍʰ-l-ə ka nə toṇḍa-i kʰa-(a)l laɡlay
now apple.3SGN DEM.DIST.OBL bag-ABL remove-PFV-3SGN COMP and mouth.OBL-INS eat-NON.FIN ATTACH.PRS.PROG.3SGM
Now he has taken the apple out of the bag and is eating it with his mouth.