मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

झाडू – ४ (लहान आकाराचा झाडू)

डाउनलोड झाडू – ४ (लहान आकाराचा झाडू)

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

जाते स्वच्छ करण्यासाठी तसेच देव्हाऱ्यात वापरला जाणारा लहान आकाराचा झाडू या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात आढळणारे शाब्दिक वैविध्य पुढीलप्रमाणे. साळूता, ज़ाडु, मुडगा, झ़ाडू, कुच़ला, साउता, बारका झाडू, पिठाचा साळूता, साळाती, पिसोंडी, साळोता, झ़ाडनी, सोडान, साळता, मुरगुडा, मोल, वरवनी, धार, मयेर, केरसुनी, मुठाम्बा, मोयाळा, मोया, मायारू, मोलाची केरसुनी, मोलाची वडवन, मोळ, सोडन, शिपली, मोलझाडू, बोळ, मोवळा, सारन, पिसुनं, पिसुन्द्री, साळूती, पिटोळी, मुगडे, सराटा, सळातो, वढवन, किशी, सान, मुडगान, खुटारो, सारन, मुळाची झ़ाडने, पिसोळी, लकझाडणी, पिटझाडणी, बुडुक, झाळंनी, फाटकनी, कुची, मच़र, बुडुख, शिरय, हालती, कुशी, हालता, हारतो, शिराव, कुस्सा, घोळ, शिरा, शिराऊ, कुच्या, फडा, बुरकुंड, बारकी, बुरखंड, सायाळू, बुडची, नेवाळ, नेवाळी, साळूता, बुन्डात, बुडखा, लहान साळूता, झान्नी, बच, पिल्ल, शिराई, बेरी, शिरांचा बच्चा, कुचा, फडूली, बायरा, फडा, छोटी झाडणी, कुंचली, शिरावी, मांगाची शिराव, बारीक शिराव, फळा, फडूली, छोटा फडा, पालूक, बरस, पिल्ल, बुळूख, भायडी, गोंडक, चौराची झारू, ठोपूल, बुळूक, बच्चा, वाहरी, चावड, झाटकी, बासोर, बासवरो, वरवन, बुचट, शिराई, बुचट , झाडणा, ब्रश, बाळनी, बरस, झटकनी, फडूली, लौची, पिटभरी, पोचारा, बारकी झारू , खाजरी, सुकली, सलाता, फरका, कुचा, लक्ष्मी, बुंडी, बुचाटना, कैसर, फडली, छोटा फडा, खुट्टा, लहान फळा, फडी, छोटा झाडू, फुलभारी, सिंधी फडे, बाहरी, कसुर, झाडूली, पोतनी,इत्यादी याचा आकार नेहमीच्या झाडूपेक्षा लहान असल्यामुळे लहान, बारीक, छोटा ही विशेषणे सदर संकल्पनेकरता वापरलेली दिसतात.