मराठी बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

पूर्ण क्रियाव्याप्ती

डाउनलोड पूर्ण क्रियाव्याप्ती

नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

व्याकरणिक विशेष : {रीती भूतकाळ}

व्याकरणिक विशेष : {पूर्ण क्रियाव्याप्ती}

क्रियाव्याप्तीद्वारे क्रियेची पूर्णता, अपूर्णता, प्रगती किंवा पुनरावृत्ती दर्शविली जाते. क्रियापदाच्या रूपाद्वारे वाक्यातील क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो तेव्हा पूर्ण क्रियाव्याप्ती आहे असे समजते. उदाहरण : ‘सुजाता घरी आली’ या प्रमाण मराठीतील वाक्यात ‘आली’ या क्रियावाचक रूपाद्वारे सुजाता घरी येण्याची घटना वाक्य उच्चारताना पूर्ण झाली आहे असा बोध होतो. प्रमाण मराठीच्या बोलीत पूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविण्यासाठी क्रियापदासोबत [-ल-] या प्रत्ययाचा उपयोग केला जातो.



१.0 व्याकरणिक विशेषाची नोंद

मराठीच्या बोलींमध्ये पूर्ण क्रियाव्याप्तीसाठी चार पर्यायी रूपे सापडली :


(१) [-ल/ल्यान/लान-]; (२) [-एल]; (३) [-न-]; (४) [-स्वर आ/अ/इ/ए/उ]. सापडलेल्या पर्यायी रूपांचा भौगोलिक व सामाजिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.

१.१ पर्यायी रूप १ : [-ल/ल्यान/लान-]

पूर्ण क्रियाव्याप्तीसाठी [-ल-] हे रूप राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सापडते. पूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणारे [-ल्यान] हे रूप खालील जिल्ह्यांत आढळले.



जिल्हा तालुका व गाव
कोल्हापूर चंदगड -चंदगड, तुडीये व कोदाळी, गडहिंग्लज - हेब्बाळ-जलद्याळ व इंचनाळ
सिंधुदुर्ग दोडामार्ग - आयी व माटणे, मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - कुडाळ, आम्रड व मानगाव, वेंगुर्ला - वेंगुर्ला, देवगड - तारामुंबरी व जामसंडे, वैभववाडी - नादवडे, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे
रत्नागिरी रत्नागिरी - मालगुंड व झाडगाव, दापोली - दाभोळ, राजापूर - कुंभवडे


पूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणारे [-लान-] हे रूप खालील जिल्ह्यांत आढळले.

जिल्हा तालुका व गाव
कोल्हापूर राधानगरी - ओलवण
रत्नागिरी खेड - जामगे व बहिरवली, दापोली - दाभोळ व पालगड
रायगड महाड - नरवण-भेलोशी


१.१.१ उदाहरण (जि. कोल्हापूर, ता. करवीर, गाव गडमुडशिंगी, पु३९, एस.सी., ९वी)
ह्या मुलग्यानं ह्या मुलग्याला टोपी दिली
hya mulɡyanə hya mulɡyala ṭopi dili
hya mulɡya-nə hya mulɡya-la ṭopi di-l-i
DEM.PROX.OBL boy.OBL-ERG DEM.PROX.OBL boy.OBL-DAT cap.3SGF give-PFV-3SGF
This boy gave the cap to that boy.

१.१.२ उदाहरण (जि. कोल्हापूर, ता. चंदगड, गाव चंदगड, स्त्री५१, महार, १ली)
परत नातू माजा तो पंद्रावी केल्यान
pərət natu maja to pəndrawi kelyan
pərət natu ma-j-a to pəndrawi ke-lyan
again grandson.3SGM I.OBL-GEN-3SGM DEM.DIST.3SGM fifteenth do-PFV.3SGM
My grandson completed graduation.

१.२ पर्यायी रूप २ : [-एल]

पूर्ण क्रियाव्याप्तीसाठी [-एल] हे पर्यायी रूप राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :



जिल्हा तालुका व गाव
अकोला अकोला - गोपाळखेड व येवता
वाशिम रिसोड - चाकोळी व घोणसर
बुलढाणा बुलढाणा - पळसखेड भट, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ
जालना जालना - धावेडी
औरंगाबाद औरंगाबाद - भिकापूर-नायगाव व पिंपळखुंटा, वैजापूर - नांदगाव व सावखेडगंगा, सोयगाव - घोसला व पळसखेडा
अहमदनगर अकोले - ब्राह्मणवाडा व डोंगरगाव, नेवासा - मोरगव्हाण
नाशिक नाशिक - विल्होळी, मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव, सुरगणा - काठीपाडा व सुरगणा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी व झारवड (खुर्द), येवला - बोकटे व निमगावमढ
जळगाव जळगाव - धामणगाव व वडली, जामनेर - वाकोद व वाघारी, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा - तांदळवाडी व वैजापूर
धुळे धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व शिरूड-खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे
नंदुरबार नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा
पालघर डहाणू - मुरबाड, पिंपळशेत व वेती, तलासरी - उधवा व गिरगाव, जव्हार - हातेरी व खंबाळा, मोखाडा - दांडवळ व कारेगाव
ठाणे मुरबाड - मढ (कातकरी समाज)
रायगड अलिबाग - बापळे, रोहा - चिंचवली (कातकरी समाज)
पुणे मुळशी - कासार-आंबोली (कातकरी समाज)


१.२.१ उदाहरण (जि. जळगाव, ता. जळगाव, गाव धामणगाव, पु३२, धनगर, १२वी)
शिवाजी महाराज़नं नियम करेल होते
šiwaǰi məharajnə niyəm kərel hote
šiwaǰi məharaj-nə niyəm kər-el hot-e
Shivaji maharaj-ERG rule.PL do-PFV be.PST-3PL
Shivaji Maharaj had made rules.

१.२.२ उदाहरण (जि. बुलढाणा, ता. बुलढाणा, गाव पळसखेड-भट, स्त्री५०+, राजपूत, अशिक्षित)
मी नाही शिकेल माय
mi nahi šikel may
mi nahi šik-el may
I NEG study-PFV VOC
Sister, I didn’t study. (= I did not go to school.)
१.३ पर्यायी रूप ३ : [-न-]


पूर्ण क्रियाव्याप्तीसाठी [-न-] हे पर्यायी रूप महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :



जिल्हा तालुका व गाव
जळगाव जळगाव - धामणगाव व वडली, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा - तांदळवाडी व वैजापूर
धुळे धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे
नंदुरबार नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा
नाशिक मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव, सुरगणा - काठीपाडा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी
पालघर डहाणू - वेती, तलासरी - उधवा, मोखाडा - कारेगाव
रायगड कर्जत - साळोख (कातकरी), रोहा - चिंचवली (कातकरी), महाड - भेलोशी (कातकरी)


१.३.१ उदाहरण (जि. धुळे, ता. धुळे, गाव लळिंग, पु२९, महार, बी.ए.)
हइ पोरनी त्या मानुसले गल्लास दिना
həi porni tya manusle ɡəllas dina
həi por-ni tya manus-le ɡəllas di-n-a
DEM.PROX.3SGF girl-ERG DEM.DIST.OBL man-DAT glass.3SGM give-PFV-3SGM
This girl gave that man a glass.

१.४ पर्यायी रूप ४ : [-स्वर आ/अ/इ/ए/उ]

पूर्ण क्रियाव्याप्तीसाठी [-स्वर आ/अ/इ/ए/उ] हे पर्यायी रूप महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :



जिल्हा तालुका व गाव
जळगाव जळगाव - वडली, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा - तांदळवाडी व वैजापूर
धुळे धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे
नंदुरबार नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा
नाशिक मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव, सुरगणा - काठीपाडा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी
पालघर डहाणू - वेती, तलासरी - उधवा, मोखाडा - कारेगाव
रायगड कर्जत - साळोख (कातकरी), रोहा - चिंचवली (कातकरी), महाड - भेलोशी (कातकरी)


१.४.१ उदाहरण (जि. धुळे, ता. धुळे, गाव खोरदड, स्त्री६०, कुणबी-पाटील, ७वी)
पानी ग्लासमा टाकं
pani ɡlasma ṭakə
pani ɡlas-ma ṭak-ə
water.3SGN glass-LOC pour-PFV.3SGN
(She) poured the water into the glass.

१.४.२ उदाहरण (जि. नंदुरबार, ता. नंदुरबार, गाव घोटाने, स्त्री२६, ओ.बी.सी., ८वी)
येक पडी गया
yek pəḍi ɡəya
yek pəḍ-i ɡəy-a
one fall-CP go-PFV.3SGM
One fell down.

१.४.३ उदाहरण (जि. नंदुरबार, ता. नंदुरबार, गाव धानोरा, स्त्री३५, मातंग/मांग, अशिक्षित)
सपरचन काडा थैलीमाइन
səpərčən kaḍa tʰəilimain
səpərčən kaḍ-a tʰəili-ma-in
apple.3SGM draw-PFV.3SGM bag-LOC-ABL
(He) took an apple out of the bag.

१.४.४ उदाहरण (जि. नंदुरबार, ता. नवापूर, गाव चिंचपाडा, पु५७, महार, ६वी)
त्यानी एक वही काढी
tyani ek wəhi kadʰi
tya-ni ek wəhi kadʰ-i
he.OBL-ERG one notbook.3SGF draw-PFV.3SGF
He took a notebook out of the (bag).