मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

झाडू – २ (सर्वसाधारणपणे घराबाहेरची स्वच्छता करण्यासाठी वापरला जातो)

डाउनलोड झाडू – २ (सर्वसाधारणपणे घराबाहेरची स्वच्छता करण्यासाठी वापरला जातो)

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

नव्या पद्धतीच्या घरात फरशीवर वापरण्यात येणारा ‘झाडू’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात आढळून आलेले शब्दवैविध्य पुढीलप्रमाणे. झ़ाडू, झाडू, जाडू, झाडणी, साळूता, साउता, साळाता, साळाती, सळोता, खराटा, किरसुनी, केरसुनी, शिंदीचा झ़ाडू, वाडवन, वाढवन, मोळ, मोल, वरवन, झ़ारू, मयेर, मयुरी, मयेरी, मोवळ, मय्रा (मय्-रा), मोळाची, फुलझ़ाडू, सारन, सान, मुगडा, साळूझ़ाडू, साळूचा, करसुंडी, कुच़्च़ा, खट्टा, कुंच़ा, कुच़ा, बाहरी, हालतो, भारा, बाहरा, सलाते, सलाटा, भारो, शिरावा, शिराई, शिराव, फडा, बोख्री, घोळ, कुच़्च़ा झ़ाळू, केस्री, बायरी, झ़ाळनी, झ़ाळू, बाहेरी, कैसर, बुडुक, बाडी, बेरा, झ़ाडी, पिशी, भाडी, बडी, झ़ान्नी, भायडी, मवाली, बुतारी, बुतारा, शिरवा, शिरी, भुतारी, केरसुली, बासोर, बासवरो, मवेरा, मवेलू, मोयडा, सराटा, लक्षुमी, मुट, सिराई, फडी, झ़ाडणा, शिराउ, झ़ारू, झ़ाडवन, लोटना, बुतुरा, झ़ाण्णो, ज़ुनू, झ़ाडवा, स्टाईल झ़ाडू, मुलाम, कयसार, सिंदिचा, शिप्री, कसुर, बोअरी, बागबाहरी, इत्यादी.

यापैकी झ़ाडू आणि त्याचे ध्वन्यात्मक वैविध्य असणारे झ़ारू, झ़ाळू इ. शब्द महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत दिसून आले. त्याचबरोबर रायगड, पालघर, धुळे, नंदुरबार आणि गडचिरोली या जिल्ह्यांत बाहरी आणि त्याचे ध्वन्यात्मक वैविध्य असणारे बायरी, बाहेरी, बाडी इ. शब्द आढळून येतात.