मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

कर्मादी

डाउनलोड कर्मादी

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ४.१ व्याकरणिक विशेष : {कर्मादी}

समकालीन मराठीच्या प्रमाण आणि बहुतांश इतर बोलींमध्ये कर्म आणि संप्रदान हे दोन्ही कारकसंबंध दर्शवण्यासाठी एकाच विभक्ती प्रत्ययाचा उपयोग होताना दिसतो. उदा. प्रमाण बोलीत 'राजाने राणीला पाहिले' आणि 'राजाने राणीला हार दिला' या वाक्यांमध्ये 'राणीला' हे एकच प्रत्ययी रूप अनुक्रमे कर्म आणि संप्रदान हे कारकसंबंध [-ला] हा प्रत्यय वापरून दर्शवते. मराठीचा हा व्याकरणिक विशेष अधोरेखित करण्यासाठी सदर प्रकल्पात 'कर्मादी' ही संज्ञा वापरली आहे. 'कर्मादी' हा कारकसंबंध दाखवण्यासाठी प्रमाण मराठीत [-ला] (एकवचन) आणि [-ना] (अनेकवचन) या प्रत्ययांचा उपयोग होतो. सर्वेक्षणात इतर बोलींमध्ये कर्मादीची निरनिराळी रूपे आढळली आहेत. त्यांचे तपशील पुढे दिले आहेत.


४.१.१ व्याकरणिक विशेषाची नोंद

मराठीच्या बोलींमध्ये कर्मादीकरिता नऊ वेगवेगळी पर्यायी रूपे आढळली आहेत :
(१) [-ला/ल्], (२) [-ले/ल्], (३) [-ल/ल्], (४) [-का/क्], (५) [-स], (६) [-ना/न्/न], (७) [-ही/हा], (८) [-ते], (९) [-शी]. सापडलेल्या प्रत्ययांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.


४.१.१.१ पर्यायी रूप १ : [-ला/ल्]

कर्मादी हा कारकसंबंध दर्शविण्यासाठी [-ला/ल्] या पर्यायाचा उपयोग राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये केला जातो.


४.१.१.१.१ उदाहरण (जि. औरंगाबाद, ता. पैठण, गाव पाचोड, स्त्री४०, मराठा, ६वी)

ह्या मुलीने पानी दिलं मुलाला
hya muline pani dilə mulala
hya muli-ne pani di-l-ə mula-la
DEM.PROX.OBL girl.OBL-ERG water.3SGN give-PFV-3SGN boy.OBL-DAT
This girl gave water to the boy.


४.१.१.१.२ उदाहरण (जि. औरंगाबाद, ता. पैठण, गाव पाचोड, स्त्री४०, मराठा, ६वी)

काल एकानी आमाला ठोकलय गाडीनं
kal ekani amala ṭʰokləy ɡaḍinə
kal eka-ni ama-la ṭʰok-l-ə-y ɡaḍi-nə
yesterday somebody-ERG we.EXCL-ACC hit-PFV-3SGN-be.PRS car-INS
Somebody hit us with a car yesterday.४.१.१.२ पर्यायी रूप २ : [-ले/ल्]

कर्मादीकरिता [-ले/ल्] हा पर्याय राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आढळला. या पर्यायाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :जिल्हे तालुका व गाव
चंद्रपूर चंद्रपूर - चकनिंबाळा व दाताळा, राजुरा - कढोली (बुद्रुक) व कोष्टाळा, ब्रह्मपुरी - पांचवाव व तोरगाव (बुद्रुक)
गडचिरोली गडचिरोली - खुर्सा व शिवणी, कोरची - बोरी व मोहगाव
गोंदिया गोंदिया - टेमनी व तेढवा, सडक अर्जुनी - चिखली
भंडारा भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी व बोरी
नागपूर नागपूर - येरला व सोनेगाव (लोधी), भिवापूर - सावरगाव व बोटेझरी, रामटेक - भोजापूर, नरखेड - उमरी व पांढरी
वर्धा वर्धा - करंजी (भोगे), आष्टी - खडका व थार, हिंगणघाट - अजंती व पोती, सेलू - वडगाव जंगली व झडशी
यवतमाळ घाटंजी - खापरी व कुर्ली, नेर - कोलुरा व दगड धानोरा
अमरावती अमरावती - सावर्डी व मलकापूर, वरूड - सातनूर व गाडेगाव, दर्यापूर - भांबोरा, जितापूर व भामोद, धारणी - कावडाझिरी
अकोला अकोला - गोपाळखेड व येवता
वाशिम वाशिम - शिरपूटी, रिसोड - घोणसर, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक)
बुलढाणा बुलढाणा - पळसखेड भट व वरवंड, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ
हिंगोली हिंगोली - कारवाडी, कळमनुरी - मोरवड
नांदेड नांदेड - लिंबगाव, मुखेड - शिरूर (दबडे)
औरंगाबाद औरंगाबाद - पिंपळखुंटा, पैठण - पाचोड (बुद्रुक), सोयगाव - घोसला व पळसखेडा
अहमदनगर अहमदनगर - नारायण डोहो, नेवासा - खलालपिंपरी
जळगाव जळगाव - धामणगाव व वडली, जामनेर - वाकोद व वाघारी, रावेर - निरूळ व मांगलवाडी, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा - वैजापूर
धुळे धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे
नंदुरबार नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा
नाशिक नाशिक - विल्होळी, मालेगाव - कळवाडी, सटाणा - मुल्हेर व दरेगाव, त्र्यंबकेश्वर - गोलदरी
पालघर डहाणू - बोर्डी, मुरबाड व पिंपळशेत, तलासरी - गिरगाव, जव्हार - हातेरी, मोखाडा - दांडवळ व कारेगाव
ठाणे मुरबाड - पाटगाव, शहापूर - बोरशेती
रायगड कर्जत - साळोख


४.१.१.२.१ उदाहरण (जि. नागपूर, ता. भिवापूर, गाव सावरगाव, स्त्री३८, महार, ११वी)

तिनं लोकंडी कुराड काडून देली त्याची कुराड त्याले
tinə lokəṇḍi kuraḍ kaḍun deli tyači kuraḍ tyale
ti-nə lokəṇḍi kuraḍ kaḍ-un de-l-i tya-č-i kuraḍ tya-le
she-ERG iron axe.3SGF draw-CP give-PFV-3SGF he.OBL-GEN-3SGF axe.3SGF he.OBL-DAT
She took out the iron axe and gave it to him.


४.१.१.२.२ उदाहरण (जि. नागपूर, ता. नागपूर, गाव येरला, पु७०, मांग, अशिक्षित)

एकीमेकीले धकाऊन रायल्या त्या
Ekimekile dʰəkaun raylya tya
ekimeki-le dʰəka-un raylya tya
each other-ACC push-CP STAY.PRS.PROG.3PLF
They are pushing each other.४.१.१.३ पर्यायी रूप ३ : [-ल/ल्]

कर्मादीसाठी [-ल/ल्] हा पर्याय राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये आढळला. या पर्यायाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :


जिल्हे तालुका व गाव
चंद्रपूर चंद्रपूर - चकनिंबाळा व दाताळा, राजुरा - कढोली (बुद्रुक) व कोष्टाळा, ब्रह्मपुरी - पांचवाव व तोरगाव (बुद्रुक)
गडचिरोली गडचिरोली - खुर्सा व शिवणी
गोंदिया सडक-अर्जुनी - चिखली
भंडारा भंडारा - मुजबी, तुमसर - बोरी
नागपूर भिवापूर - बोटेझरी व भिवापूर
यवतमाळ नेर - दगड-धानोरा
वाशिम रिसोड - घोणसर
बुलढाणा जळगाव-जामोद - वडगाव पाटण, शेगाव - शिरजगाव (निळे)
हिंगोली कळमनुरी - मोरवड
लातूर लातूर - बाभळगाव
जालना जालना - धावेडी, मंठा - उसवद
औरंगाबाद औरंगाबाद - भिकापूर-नायगाव, पैठण - पाचोड (बुद्रुक
जळगाव जळगाव - धामणगाव, जामनेर - वाकोद व वाघारी
नंदुरबार नवापूर - चिंचपाडा
नाशिक सटाणा - दरेगाव, सुरगणा - सुरगणा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी
पालघर वसई - वाघोली, डहाणू - बोर्डी, मुरबाड व पिंपळशेत, तलासरी - उधवा व गिरगाव, जव्हार - हातेरी व खंबाळा, मोखाडा - दांडवळ व कारेगाव
ठाणे शहापूर - बोरशेती व चौंढे (बुद्रुक)
रत्नागिरी राजापूर - कुंभवडे
कोल्हापूर कागल - गोरंबे


४.१.१.३.१ उदाहरण (जि. हिंगोली, ता. कळमनुरी, गाव मोरवड, पु६०, अंध, अशिक्षित)

लं थंडी वाज़ायली mə tʰəṇḍi wajayli
mə- tʰəṇḍi waj-ayli
I-DAT cold.3SGF sound-PRS.PROG.3SGF
I am feeling cold.


४.१.१.३.२ उदाहरण (जि. जालना, ता. मंठा, गाव उसवद, पु४५, मराठा, 6 वी)

ती मनला नाय नाय तुलं कसं मारू
ti mənla nay nay tu kəsə maru
ti mən-l-a nay nay tu- kəsə mar-u
he say-PFV-3SGM NEG REDUP you-ACC how.3SGN hit-NON.FIN
He said, “No, no, how can I hit you?”४.१.१.४ पर्यायी रूप ४ : [-का/क्]

कर्मादीकरिता [-का/क्] हे पर्यायी रूप राज्यातील चार जिल्ह्यांत आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :


जिल्हे तालुका व गाव
कोल्हापूर चंदगड - कोदाळी, राधानगरी - ओलवण
सिंधुदुर्ग दोडामार्ग - आयी व माटणे, मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - आम्रड, मानगाव व कुडाळ, वेंगुर्ला - वेंगुर्ला, देवगड - तारामुंबरी व जामसंडे, वैभववाडी - नादवडे, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे
रत्नगिरी राजापूर - कुंभवडे
ठाणे शहापूर - बोरशेती


४.१.१.४.१ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. मालवण, गाव देऊळवाडा, स्त्री४८, मराठा, बी.ए.)

ती आज़ारी असा बरं नाइ तिका
ti ajari əsa bərə nai tika
ti ajari əsa bərə nai ti-ka
she sick be.PRS good NEG she-DAT
She is sick, she is not well.


४.१.१.४.२ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. मालवण, गाव कट्टा, स्त्री५०, भंडारी, ७ वी)
सांगतत एकामका काइतरी
saṅɡtət ekaməkak kaitəri
saṅɡ-t-ət ekaməka-k kaitəri
tell-IPFV-PL each other-ACC something
They are telling each other something.

४.१.१.५ पर्यायी रूप ५ : [-स]

केवळ संप्रदान या कारकसंबंधाचा निर्देश करण्यासाठी [-स] हे पर्यायी रूप राज्यातील सिंधुदुर्ग (कुडाळ या तालुक्याच्या गावात), कोल्हापूर जिल्हा, सोलापूर (बार्शी तालुक्यातील गौडगाव), लातूर (लातूर तालुक्यातील तांदुळजा) आणि नागपूर (भिवापूर तालुक्यातील सावरगाव) या पाच जिल्ह्यांमध्ये आढळले. मात्र या जिल्ह्यांत कर्म या कारकसंबंधाचा निर्देश करण्यासाठी अनुक्रमे सिंधुदुर्गमध्ये [-ला] आणि [-का] ही पर्यायी रूपे, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांत [-ला], [-ल] ही पर्यायी रूपे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये [-ला] आणि [-ले] ही पर्यायी रूपे आढळली. संप्रदान कारकसंबंधाचा निर्देश करण्यासाठी आढळलेल्या [-स] या पर्यायाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे खाली दिली आहेत :


जिल्हे तालुका व गाव
सिंधुदुर्ग कुडाळ - कुडाळ
कोल्हापूर कागल - एकोंडी, चंदगड - चंदगड व तुडीये, राधानगरी - सोन्याची शिरोली
सोलापूर बार्शी - गौडगाव
लातूर लातूर - तांदुळजा
नागपूर भिवापूर - सावरगाव


४.१.१.५.१ उदाहरण (जि. कोल्हापूर, ता. कागल, गाव एकोंडी, स्त्री५०+, ५वी)

मुलीन त्या मानसा ग्लास दिला
mulin tya mansas ɡlas dila
muli-n tya mansa-s ɡlas di-l-a
girl.OBL-ERG DEM.DIST.OBL man.OBL-DAT glass.3SGM give-PFV-3SGM
(The) Girl gave that man a glass.४.१.१.६ पर्यायी रूप ६ : [-ना/न्/न]

कर्मादीकरिता [-ना/न्/न] हे पर्यायी रूप राज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये सापडले आहे. या पर्यायाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे खाली दिली आहेत :


जिल्हे तालुका व गाव
रायगड अलिबाग - मांडवा, बोडणी व बापळे, मुरूड - चिंचघर, श्रीवर्धन - बागमांडला, महाड - नरवण
ठाणे मुरबाड - पाटगाव (आगरी समाज)
पालघर वसई - कळंब (मांगेला समाज)
जळगाव जळगाव - वडली (मराठा समाज)


४.१.१.६.१ उदाहरण (जि. रायगड, ता. अलिबाग, गाव बोडनी, स्त्री५१, कोळी, दुसरी)

माझी बुक कुट हाय मना नाय कलत
maǰʰi buk kuṭ hay məna nay kələt
ma-ǰʰ-i buk kuṭ hay mə-na nay kələ-t
I-GEN-3SGF book.3SGF where be.PRS I-DAT NEG understand-IPFV
I don't know where my book is.


४.१.१.६.२ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव कळंब, पु८०, मांगेला, बी.ए.)

ते पोरीला हांगनार तेना हाक मारा
te porila haṇɡnar tena hak mara
te pori-la haṇɡ-nar te-na hak mara
DEM.DIST.3SG girl-ACC tell-PROS he.OBL-ACC call HIT.IMP
(She) will tell that girl to call him.४.१.१.७ पर्यायी रूप ७ : [-ही/हा]

कर्मादीसाठी [-ही/हा] हे पर्यायी रूप राज्यातील केवळ पालघर जिल्हात सापडले: वसई तालुक्यात वाघोलीतील वाडवळ समाजात आणि कळंब गावातील मांगेला समाजात तसेच तलासरी तालुक्यात गिरगाव मधील वारली समाजात सापडले आहे.


४.१.१.७.१ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव वाघोली, स्त्री६१/४१, पाचकलाशी वाडवळ, ९वी, एम.ए.)

तेही गाढ निज़ लागली
tehi ɡaḍʰ nij laɡli
te-hi ɡaḍʰ nij laɡ-l-i
he.OBL-DAT deep sleep.3SGF attach-PFV-3SGF
He fell into a deep sleep.
४.१.१.७.२ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव कळंब, पु८०, मांगेला, बी.ए.)

त्यानं उप्पट मारली त्याही
tyanə uppəṭ marli tyahi
tya-nə uppəṭ mar-l-i tya-hi
he.OBL slap.3SGF hit-PFV-3SGF he.OBL-ACC
He slapped him.४.१.१.८ पर्यायी रूप ८ : [-ते]

केवळ संप्रदान या कारकसंबंधाचा निर्देश करण्यासाठी [-ते] हे पर्यायी रूप राज्यातील फक्त पालघर जिल्ह्यात मिळाले: वसई तालुक्यात निर्मळ गावातील रोमन कॅथलिक सामवेदी समाजात हे रूप आढळले मात्र याच समाजात कर्म या कारकसंबंधाचा निर्देश करणासाठी [-ला] हे पर्यायी रूप आढळले.४.१.१.८.१ उदाहरण
(जि. पालघर, ता. वसई, गाव निर्मळ, स्त्री५६/पु६०, रोमन कॅथलिक सामवेदी, बी.ए.)

ते का करहें
te ka kərhẽ
mə-te ka kər-hẽ
I-DAT what do-NON.FIN
What should I do? (= I am not concerned about this.)४.१.१.९ पर्यायी रूप ९ : [-शी]

केवळ संप्रदान या कारकसंबंधाचा निर्देश करण्यासाठी [-शी] हा पर्याय राज्यातील फक्त रायगड जिल्ह्यात मिळाला: कर्जत तालुक्यात साळोख गावातील कातकरी समाजात हा पर्याय आढळला. (सर्वेक्षणात मिळालेले उदाहरण ४.१.१.९.१ पाहा. यात ‘संप्रदान’ कारकसंबंधाचे लाभार्थी दर्शविणे हे विहित कार्य दिसत नसून क्रियेच्या हेतूचा निर्देश करण्यासाठी [-शी] चा उपयोग झालेला दिसतो.) रायगड जिल्ह्यातील याच कातकरी समाजाच्या बोलीत कर्म कारकसंबंधाचा निर्देश करणासाठी [-ला] आणी [-ले] ही पर्यायी रूपे आढळली.


४.१.१.९.१ उदाहरण (जि. रायगड, ता. कर्जत, गाव साळोख, स्त्री२५, कातकरी, अशिक्षित)

मंजुरीशी ज़ातो आमी
məñjuriši jato ami
məñjuri-ši ja-t-o ami
daily wages-DAT go-IPFV-1PL we.EXCL
We go for daily wages.