मराठी बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

मागे

डाउनलोड मागे

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘पाठीमागील दिशा’ या संकल्पनेसाठी माग, मागे, मागोमाग, मागुन, माघ, माघारशी, माघारी, मांघारी, मांगारी, मांगी, पाठीमागे, पाठीमाग, पाटीमागे, पाटीमांग, पाटीमागन, पट्टीमांगा, पाठी, पाठीशी, पाठीकड, पाटकडे, पाटीकडे, फाट्सुन, फाट्ल्यान, पाटल्यान, मंगराटे, मंगराइ, मंगारशी, पिछे, पछ, पछो, पिज्जा, पासमा, पाठीधर, इ. असे वैविध्य आढळून आले.

महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाठीमागे आणि मागे हे शब्द वापरले जातात. या दोन्ही शब्दांचे ध्वन्यात्मक भेदही आढळून आले. पट्टीमांगा हा शब्द रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात आढळतो. वर नमूद केलेल्या शब्दांपैकी फाट्ल्यान हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आयी गावात आढळून येतो. फाटसुन, पाटसुन हे शब्द सिंधुदुर्गात वैभववाडी, वेंगुर्ला, आणि दोडामार्ग या तालुक्यात तुरळक प्रमाणात आढळतात. मंगराटे हा शब्द पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात बोर्डी गावात मांगेला समाजातील एक व्यक्तीने सांगितला आहे. मंगराइ, मंगारशी इत्यादी याचे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. मांगी हा शब्द नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील खानापूर गावात आढळला आहे. पिछे हा शब्द सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यात मुस्लिम समाजात आढळतो. पछ, पछो हे शब्द धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यात पावरा समजात सांगितला आहे. पज्जा हा शब्द यवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली गावात (ता. घाटंजी) राजगोंड समाजात मिळाला आहे (तर पिज्जा हा ध्वन्यात्मक भेद गोंदिया तालुक्यातील कासा गावात आढळला). पासमा हा शब्द नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात हा शब्द मिळाला आहे. पिटवर, पाटीखाली, हे शब्द अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात कासमार गावातील कोरकू समाजात आढळले आहेत. त्याचबरोबर भावडीताउन हा कोरकू भाषेतील शब्द मिळाला आहे.