नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. व्याकरणिक विशेष : {आभ्यंतर-अधिकरण}
वाक्यातील क्रिया/व्यक्ती/ वस्तू इ.चे स्थान दर्शविणाऱ्या शब्दांतील संबंधास अधिकरण असे म्हणतात. ‘मी मुंबईत राहते’ या प्रमाण मराठीतील वाक्यात ‘राहणे’ या क्रियेचे स्थान (मुंबई) याचा निर्देश करण्यासाठी [-त] या आभ्यंतर (inessive) विभक्ती प्रत्ययाचा उपयोग होतो. अधिकरण कारकाचे इतर प्रकार दाखविण्यासाठी प्रमाण मराठीत इतर विभक्ती प्रत्ययांचा वापर होतो. उदा. गंतव्य (allative/directive) कारक संबंध दर्शविण्याकरिता [-ला] या गंतव्य-वाचक विभक्तीचा वापर होतो. उदा. ‘मी मुंबईला गेले’. आभ्यंतर-अधिकरण कारकाचा निर्देश करण्यासाठी सर्वेक्षणात आढळलेल्या पर्यायी प्रत्ययी रूपांच्या भौगोलिक-सामाजिक प्रसाराचे तपशील खाली दिले आहेत.
१.0 व्याकरणिक विशेषाची नोंदमराठीच्या विविध बोलींमध्ये आभ्यंतर-अधिकरण या कारकासाठी १० विभक्ती प्रत्ययी रूपे आढळली आहेत : (१) [-त], (२) [-ला/ल्], (३) [-ले/ल्], (४) [-ल/ल्], (५) [-न/न्/ना/नी], (६) [-मा/म्], (७) [-शी], (८) [-त्नी/त्न], (९) [-क्/क/का], (१०) [-शीन]. आभ्यंतर-अधिकरण या कारकासाठी आढळलेल्या विभक्ती प्रत्ययांचा भौगोलिक-सामाजिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
१.१ पर्यायी रूप १ : [-त] आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधासाठी [-त] हा पर्याय राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळला. १.१.१ उदाहरण (जि. चंद्रपूर, ता. ब्रह्मपुरी, गाव पाचगाव, स्त्री५१, ढिवर, अशिक्षित) विकायला आता आमी दुकानात नेतून wikayla ata ami dukanat netun wik-ayla ata ami dukan-a-t ne-t-un sell-NON.FIN now we.EXCL shop-OBL-LOC carry-IPFV-1PL We take it in the store to sell. १.२ पर्यायी रूप २ : [-ला/ल्]आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधाचा निर्देश करण्यासाठी [-ला/ल्] हे पर्यायी रूप राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सापडले.
१.२.१ उदाहरण (जि. बीड, ता. अंबाजोगाई, गाव सातेफळ, स्त्री५५, महार, अशिक्षित) नातेवाईक पुन्याला रातेत भाउ natewaik punyala ratet bʰau natewaik punya-la ra-t-et bʰau relatives Pune.OBL-LOC stay-IPFV-3PL brother (My) Relatives live in Pune. १.३ पर्यायी रूप ३ : [-ले/ल्]आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधासाठी [-ले/ल्] हे पर्यायी रूप राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरण खाली दिले आहे :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
चंद्रपूर | चंद्रपूर - चकनिंबाळा, राजुरा - कढोली (बुद्रुक) व कोष्टाळा,ब्रह्मपुरी - पांचगाव |
गडचिरोली | गडचिरोली - खुर्सा, कोरची - मोहगाव |
गोंदिया | गोंदिया - टेमनी व तेढवा |
भंडारा | भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी |
नागपूर | नागपूर - येरला, भिवापूर - सावरगाव व बोटेझरी, रामटेक - भोजापूर व करवाही, नरखेड - उमरी व पांढरी |
वर्धा | वर्धा - करंजी (भोगे), हिंगणघाट - पोती, सेलू - झडशी |
यवतमाळ | नेर - कोलुरा व दगड धानोरा |
अमरावती - सावर्डी व मलकापूर, वरूड - सातनूर व गाडेगाव, दर्यापूर - भांबोरा, जितापूर व भामोद, धारणी - कावडाझिरी | |
अकोला | अकोला - गोपाळखेड व येवता |
वाशिम | वाशिम - शिरपूटी, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक) |
बुलढाणा | बुलढाणा - पळसखेड भट, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ |
हिंगोली | कळमनुरी - मोरवड |
औरंगाबाद | वैजापूर - सावखेडगंगा, पैठण - पाचोड (बुद्रुक), सोयगाव - घोसला व पळसखेडा |
जळगाव | जळगाव - धामणगाव व वडली, जामनेर - वाकोद व वाघारी, रावेर - निरूळ व मांगलवाडी, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा - तांदळवाडी |
धुळे | धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा |
नाशिक | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा), सटाणा - दरेगाव, सुरगणा - काठीपाडा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी |
पालघर | तलासरी - उधवा व गिरगाव, जव्हार - हातेरी, मोखाडा - दांडवळ |
ठाणे | मुरबाड - मढ |
आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधाचा निर्देश करण्यासाठी [-ल/ल्] हे पर्यायी रूप राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक प्रसार आणि उदाहरण खाली दिले आहे :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
गोंदिया | सडक-अर्जुनी - चिखली |
गडचिरोली | गडचिरोली - खुर्सा व शिवनी |
भंडारा | भंडारा - मुजबी |
चंद्रपूर | ब्रह्मपुरी - तोरगाव (बुद्रुक) |
हिंगोली | कळमनुरी - मोरवड |
उस्मानाबाद | उस्मानाबाद - कोंड |
नाशिक | त्र्यंबकेश्वर - गोलदरी |
पालघर | वसई - वाघोली, डहाणू - मुरबाड व पिंपळशेत, तलासरी - उधवा, जव्हार - हातेरी, मोखाडा - दांडवळ व कारेगाव |
ठाणे | शहापूर - चौंढे (बुद्रुक) व बोरशेती |
रत्नागिरी | रत्नागिरी - सोमेश्वर |
सिंधुदुर्ग | कुडाळ - कुडाळ |
आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधासाठी [-न/न्/ना/नी] हे पर्यायी रूप राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायी रूपाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे खाली दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
गडचिरोली | कोरची - बोरी व मोहगाव |
चंद्रपूर | राजुरा - कढोली (बुद्रुक) व कोष्टाळा |
नागपूर | नरखेड - पांढरी (किराड समाज) |
अमरावती | धारणी - कावडाझिरी |
यवतमाळ | घाटंजी - कुर्ली |
हिंगोली | कळमनुरी - मोरवड |
औरंगाबाद | औरंगाबाद - पिंपळखुंटा |
नंदुरबार | शहादा - प्रकाशा |
नाशिक | त्र्यंबकेश्वर - गोलदरी |
पालघर | वसई - वाघोली, कळंब व निर्मळ, डहाणू - मुरबाड व पिंपळशेत, जव्हार - हातेरी |
ठाणे | भिवंडी - भिवाली |
रायगड | कर्जत - साळोख, अलिबाग - मांडवा |
रत्नागिरी | रत्नागिरी - मालगुंड |
सिंधुदुर्ग | दोडामार्ग - आयी |
आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधाचा निर्देश करण्यासाठी [-मा/म] हे पर्यायी रूप राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये आढळले. या पर्यायाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरण खाली दिले आहे :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
जळगाव | जळगाव - धामणगाव, रावेर - निरूळ व मांगलवाडी, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा - तांदळवाडी व वैजापूर |
धुळे | धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा |
नाशिक | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा), सटाणा - दरेगाव, सुरगणा - काठीपाडा |
पालघर | वसई- कळंब व निर्मळ, डहाणू - बोर्डी, मुरबाड, पिंपळशेत व वेती |
रायगड | कर्जत - साळोख, अलिबाग - बापळे, रोहा - चिंचवली, महाड - नरवण |
नांदेड | देगलूर - रमतापूर (हटकर समाज) |
नागपूर | नरखेड - पांढरी (किराड समाज) |
आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधासाठी [-शी] हा पर्याय राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये आढळला. या पर्यायाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे खाली दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
जळगाव | वसई - वाघोली (सामवेदी ब्राह्मण समाज), निर्मळ (रोमन कॅथलिक सामवेदी समाज) व कळंब (मांगेला ओबीसी समाज), डहाणू - बोर्डी (वाडवळ समाज), तलासरी - उधवा (वारली समाज) |
पालघर | वसई - वाघोली (सामवेदी ब्राह्मण समाज), निर्मळ (रोमन कॅथलिक सामवेदी समाज) व कळंब (मांगेला ओबीसी समाज), डहाणू - बोर्डी (वाडवळ समाज), तलासरी - उधवा (वारली समाज) |
पालघर | वसई - वाघोली (सामवेदी ब्राह्मण समाज), निर्मळ (रोमन कॅथलिक सामवेदी समाज) व कळंब (मांगेला ओबीसी समाज), डहाणू - बोर्डी (वाडवळ समाज), तलासरी - उधवा (वारली समाज) |
पालघर | वसई - वाघोली (सामवेदी ब्राह्मण समाज), निर्मळ (रोमन कॅथलिक सामवेदी समाज) व कळंब (मांगेला ओबीसी समाज), डहाणू - बोर्डी (वाडवळ समाज), तलासरी - उधवा (वारली समाज) |
पालघर | वसई - वाघोली (सामवेदी ब्राह्मण समाज), निर्मळ (रोमन कॅथलिक सामवेदी समाज) व कळंब (मांगेला ओबीसी समाज), डहाणू - बोर्डी (वाडवळ समाज), तलासरी - उधवा (वारली समाज) |
आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधाचा निर्देश करण्यासाठी [-त्नी/त्न] हे पर्यायी रूप राज्यातील केवळ ३ जिल्ह्यांत आढळले. या पर्यायाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरण खाली दिले आहे :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
यवतमाळ | नेर - कोलूरा (धनगर समाज) व दगड धानोरा |
वाशिम | वाशिम - शिरपुटी, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक) |
कोल्हापूर | शाहूवाडी - शाहूवाडी व खुटाळवाडी, कागल - गोरांबे, चंदगड - चंदगड व तुडीये, गडहिंग्लज - हेब्बाळ जलद्याळ व इंचनाळ |
आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधासाठी [-क्/क/का] हे पर्यायी रूप राज्यातील केवळ ३ जिल्ह्यांत आढळले. या पर्यायाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे खाली दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
रत्नागिरी | राजापूर - कुंभवडे |
सिंधुदुर्ग | दोडामार्ग - आयी व माटणे, मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - आम्रड व मानगाव, वेंगुर्ला - वेंगुर्ला, देवगड - तारामुंबरी व जामसंडे, वैभववाडी - नादवडे, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे |
कोल्हापूर | चंदगड - कोदाळी, राधानगरी - ओलवन (मराठा समाज) |
आभ्यंतर-अधिकरण या कारक संबंधाचा निर्देश करण्यासाठी [-शीन] हा पर्याय राज्यातील केवळ नागपूर जिल्ह्यामधील भिवापूर तालुक्यातील बोटेझरी गावातील खैरे-कुणबी समाजात आढळला.
१.१०.१ उदाहरण (जि. नागपूर, ता. भिवापूर, गाव बोटेझरी, स्त्री७०, खैरे-कुणबी, अशिक्षित) पैलेच्या सुनाशीन लगीत फरक पडते ना pəileča sunašin ləɡit pʰərək pəḍte na pəile-č-a suna-šin ləɡit pʰərək pəḍ-t-e na first-GEN-OBL daughter-in-law.PL-LOC much difference fall-IPFV-3SG DM There is much difference between today’s daughters-in-law and those of the previous times.