हे मॅन्युअल ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण’ या संकेतस्थळासाठी तयार केले आहे. (दुवा: https://www.sdml.ac.in)
(किंवा https://www.marathidialectsurvey.ac.in )
या ‘USER MANUAL’ मध्ये पुढील विषयांबाबत माहिती दिली आहे:
शब्दस्तरीय भाषिक विशेष
शब्दस्तरीय भाषिक विशेष म्हणजे काय
शब्दस्तरीय वैशिष्ट्ये अर्थात शब्दसंग्रह, म्हणजे शब्द. भाषेचे प्रादेशिक बदल त्वरित काही विशिष्ट शब्दांच्या वापरातून तसेच ध्वनी ताल (उच्चारण ) च्या रूपात ओळखता येतात. उदा. मुलगा, पोरगा, ल्योक, आंडोर, डिकरा, झील, चेडो, भुर्गे, पोटं, टुरा, लेक, टुडाल, लेकुस, सोहरा, पोश्या ह्या काही ‘ व्यक्तीच्या मुलासाठीच्या संज्ञा ’ मराठीत आहेत.
सर्वेक्षणासाठी शब्दस्तरीय विशेष कसे निश्चित केले
एस.डी.एम.एल. साठी घेण्यात आलेल्या शब्दस्तरीय घटक मुख्यत: धोंगडे (२०१३) यांच्या अभ्यासावर आधारित आहेत. हा अभ्यास पूर्णपणे शब्दाच्या पुराव्यावर आधारित आहे, यावरुन असा निष्कर्ष काढला आहे की, मराठीच्या प्रादेशिक बोली मराठीच्या प्रमाणभाषेपेक्षा भिन्न आहेत. या अभ्यासात नमूद केलेल्या २९०० शब्द्स्तरांपैकी अंदाजे २५% आहे. एस.डी.एम.एल. ने अन्य बोली अभ्यासामधून गोळा केलेल्या शब्दांच्या व्यतिरिक्त २५% सर्वात अधिक विशिष्ट शब्दस्तरीय घटकांचा वापर केला आहे. या सर्वेक्षणात एकूण सत्तर शब्दस्तरीय घटक मिळविण्यात आले आहेत. हे पुढील अर्थक्षेत्राशी निगडीत आहेत: घरगुती वस्तू, भाज्या, व्यक्ती, काळ, स्थान प्रदर्शक संज्ञा, आणि नातेवाचक संज्ञा.
सर्वेक्षणात शब्दस्तरीय भाषा सामग्री मिळविण्याची पद्धती
द्विभाषिय भाषिक ज्यांनी मराठी अस्खलित येत असल्याचा दावा केला आहे आणि गावातील संपर्क भाषा म्हणून मराठी भाषा वापरत असल्याचे सांगितले, त्यांनी वापरलेले शब्दस्तरीय घटक देखील कोडित/ समाविष्ट केले आहेत: हे बहुतेकदा भाषकाच्या एल १ मधील शब्द होते ( उदा. हिंदी- उर्दू, तेलगू, कन्नड, गोंडी, भिल्ली इ. )
शब्द स्तरीय विशेशामचे
शब्दस्तरीय सामग्रीचे लिप्यंतरण कसे केले आहे
नकाशावर शब्दस्तरीय माहिती कशी सादर केली जाते ?
‘फीचर्स’ या टॅबवर क्लिक केल्यावर वापरकर्त्याला ‘लेक्सिकल फीचर्स’/ ‘शब्दासंबंधीत वैशिष्ट्ये’ आणि ‘ग्रमॅटीकल फीचर्स’ / ‘व्याकरणिक वैशिष्ट्ये’ मिळवता येतील. खाली दिलेल्या वेब पृष्ठाच्या स्क्रिनशॉटमधील लाल वर्तुळाचा संदर्भ घ्यावा. या सर्वेक्षाणातून मिळवलेले सत्तर शब्दस्तरीय सामग्री ‘ लेक्सिकल फीचर्स ‘ / शब्दावली वैशिष्ट्ये’ अंतर्गत सूचीबद्ध केलेली आहेत ( स्क्रिनशॉटमधील पिवळ्या रंगाचा बॉक्स ). यातील कोणत्याही शब्दस्तरीय सामग्रीवर क्लिक केल्यावर, ड्रॉप डाऊन मेनू, ( स्क्रिनशॉटमधील खालील निळ्या रंगाचा बॉक्स ) नमुने केलेल्या खेड्यांमधील प्राप्त झालेल्या सर्व शाब्दिक रूपांचे प्रदर्शन करते. उदा. शब्दस्तरीय वैशिष्ट्य ‘ पिण्याच्या पाण्यासाठीचे भांडे ’ यासाठी प्राप्त झालेले शब्दाचे रूप पुढील : waṭi (वाटी), ɡəlas (गलास), pʰulpatrə (फुलपात्र), məɡɡa (मग्गा), pæli (पॅली), bʰaṇḍə (भांड), kəra (करा), jamb (जांब), loṭa (लोटा), pelo (पेलो), ɡəllas (गल्लास), waṭko (वाटको), ḍəwnə (डवनं), ɡəḍu (गडू), इ. जे या ‘ लेक्सिकल फीचर ’ च्या ‘ व्हेरिएंट ’ अंतर्गत सूचीबद्ध आहेत. वेबपृष्ठाच्या मध्यभागी असलेल्या नकाशामध्ये विशिष्ट प्रकारचे भौगोलिक वर्गीकरण पाहिले जाऊ शकते.
नकाशामध्ये रंगीत ठिपकांच्या द्वारे ( पिवळा रंग कमी वारंवारता; गडद नारंगी रंग उच्च वारंवारता ) एखाद्या विशिष्ट शब्दस्तराची वारंवारता दर्शवली आहे.
जर वापरकर्त्यास एखाद्या विशिष्ट शब्दास्तराचा फरक जाणण्यासाठी ऑडिओ ऐकायचा असेल तर निळ्या बॉक्समधील ड्रॉप डाऊन मेनूमधील व्हेरिएंट निवडावा आणि नंतर ‘ क्लिक टू प्ले व्हॉईस ’ वर क्लिक करावे ( स्क्रिनशॉटमधील पिवळे वर्तुळ ). विशिष्ट शब्दस्तरीय सामग्री मिळविण्यासाठी वापरण्यात येणारे चित्र आपण पाहू इच्छित असल्यास ड्रॉप डाऊन मेनूमधील शब्दावली वैशिष्ट्य निवडावे ( स्क्रिनशॉटमध्ये दाखविलेला डाव्या बाजुचा पिवळा बॉक्स ) आणि नंतर स्क्रिनशॉटच्या उजव्या बाजूचे दाखविलेले पिवळे वर्तुळ, तिथे ‘ क्लिक हिअर टू व्हुव इमेज ’ येथे क्लिक करावे.
या पृष्ठावर वापरकर्त्यास महाराष्ट्राचा आरेखित जिल्हा नकाशा दिसेल. नकाशावर फिरताना, विशिष्ट जिल्ह्याचे नाव पाहिले जाऊ शकते. जिल्ह्यावर एकदा क्लिक करून झूम वाढवू शकतो आणि पुन्हा क्लिक करून झूम कमी करू शकतो. कोणत्याही जिल्ह्यात झूम केल्यानंतर, नमुना असलेल्या गावाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वर्तुळावर क्लिक करू शकता. खालील स्क्रिनशॉट पहा:
एक पॉप-अप बॉक्स आढळतो, ज्यामध्ये विशिष्ट गावातून संकलित केलेली संपूर्ण शब्दस्तरीय सामग्रीची माहिती पाहिली जाऊ शकते. खालील स्क्रिनशॉट पहा.
व्याकरणिक विशेष
व्याकरणिक विशेष म्हणजे काय
शब्द तयार करण्याची प्रक्रिया किंवा शब्द आणि वाक्य यातील वाक्यरचनीय संबंध यासारख्या व्याकरणासंबंधीत वैशिष्ट्यास ‘ व्याकरण वैशिष्ट ’ म्हणून संबोधले जाते. उदा. १, ‘रस्ता ’ या संज्ञेशी जोडलेले विविध विभक्ती प्रत्यय : रस्त्याला ( कर्म / द्वितीया) , रस्त्यात ( अधिकरण / सप्तमी ), रस्त्यात ( अपादान / पंचमी ), रस्त्यानी ( करण / तृतीया ). उदा. २, वाक्यातील सुसंवाद, अनुक्रमे भिंत पडली किंवा भिंत पडलं – ‘ भिंत पडली – स्त्रीलिंगी सुसंवाद ’ आणि ‘ भिंत पडलं – नपुंसकलिंगी सुसंवाद ’.
सर्वेक्षणातील व्याकरणिक विशेष कसे निश्चित केले
मागील प्रकाशित कामांवरून आणि महाराष्ट्रातील माहिती संकलनाच्या मागील अनुभवाच्या आधारे सुमारे वीस व्याकराणाची वैशिष्ट्ये ओळखली गेली. अशी अपेक्षा होती की, या वैशिष्ट्यांचा एक उपसंच – मराठीतील प्र्मुख द्वंद्वात्मक / बोली विभागांना ओळखण्यासाठी निदानात्मक ठरू शकेल. या वैशिष्ट्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे : (१) लिंग प्रणाली (२) विभक्ती प्रत्यय (३) व्याप्ती चिन्हित करणे (४) काळ चिन्हित करणे (५) क्रियापद चिन्हांकित करताना व्यक्ती आणि संख्या फरक (६) उपवाक्यातील सकर्मक परिपूर्ण क्रियापद चिन्हांकित करणे (७) उपवाक्यातील सकर्मक परिपूर्ण क्रियापदातील सुसंवाद , इ.
सर्वेक्षणातील व्याकरणिक विशेष भाषाकांकडून कसे मिळविले
सत्तर व्हिडिओंचा समावेश असलेला ‘ डेक्कन कॉलेज स्टिम्युलस ’ चा विशिष्ट व्याकरणाची वैशिष्ट्ये मिळवण्यासाठी वापर करण्यात आला आहे. येथे त्याचा दुवा दिला आहे.