यापूर्वी झालेल्या भाषिक सर्वेक्षणामध्ये आडना या संकल्पनेसाठी बोलींमध्ये फार थोडे वैविध्य असल्याची नोंद आहे. साखळी या एकाच वेगळ्या शब्दाची नोंद आहे. सदर सर्वेक्षणात या संकल्पनेसाठी आडना, आडगुना, खिट्टी, खटका, दंडका, कोयंडा, आडसर, आडची, माकडी, डांबर्या, टीच़कनी, साखर्या, संकलकडी, मिच़गार्या, बिजीगिरी, कुत्रं, घोडी, माज़रबोक्या, पट्टीकडी असे शब्द वैविध्य सापडले आहे. पूर्वी बऱ्याचदा कुत्रा, घोडा, मांजर हे प्राणी घराच्या दाराशी संरक्षणासाठी असायचे. घराच्या दाराला असणारा आडनाही घराच्या संरक्षणाचेच काम करत असल्याने हे शब्द काही ठिकाणी या संकल्पनेसाठी वापरत असावेत.