या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. वाटी, वाटकी, ग्लास, पेला, वाटका , भांडं, फुलपात्र, कप, करा, जांब, पेलो, वाटको, प्येला, प्याला, जग, फुलपातंर, कोप, लोट, तम्बालु, गलास, मग्गा, प्याली, संपुट, डवनं, झाकन, टम्बरेल, गडू, चंबू, बुटलं, येळणी, भगुनं, बऊल, डवला, कटोरा, गंजं, बटकी, डोवी, टापणो, चंबुलं, पंचपात्रं, बोळी, झाकनी, रामपात्रं, टिल्ली, दुदभांडं, दुदपात्रं, तवेली इ. यांपैकी ‘पेला’ या शब्दाचे भौगोलिक क्षेत्र जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले दिसते. ‘जांब’, ‘पेलो’, ‘वाटको’ हे शब्द प्रामुख्याने कोल्हापूरमधील चंदगड तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि पालघर जिल्हा या ठिकाणी आढळून आले आहेत. ‘संपुट’ हा शब्द धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सापडतो. ‘येळनी’ हा शब्द केवळ लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे.