नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. व्याकरणिक विशेष : तृतीय पुरुष एकवचन नामाच्या लिंगाशी क्रियापदाचा सुसंवाद
प्रमाण मराठीतील ‘कासव जिंकतं, ससा हरतो आणि गोष्ट संपते’ या अपूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणाऱ्या वाक्यात ‘जिंकतं’, ‘हरतो’ आणि ‘संपते’ या क्रियापदांचा अनुक्रमे ‘कासव (नपुंसकलिंग)’, ‘ससा (पुल्लिंग)’ आणि ‘गोष्ट (स्त्रीलिंग)’ या तृतीय पुरुष एक वचनातील (तृ.पु.ए.व.) नामांच्या लिंगाशी सुसंवाद असल्याचे दिसते. मराठीच्या काही प्रादेशिक बोलींमध्ये अपूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणाऱ्या वाक्यांमध्ये हा सुसंवाद पर्यायाने (काही वेळा) होत नसल्याचे दिसून येते. याचा अर्थ असा की एकाच व्यक्तीच्या / गावातील बोलीप्रकारात ‘मुलगा पळतो, मुलगी पळते’ आणि ‘मुलगा पळते, मुलगी पळते’ अशा दोन्ही प्रकारच्या रचना आढळतात.
१.0 व्याकरणिक विशेषाची नोंदसदर व्याकरणिक विशेषाच्या संदर्भात मराठीच्या विविध बोलींमध्ये २ पर्यायी रचना आढळल्या आहेत : अपूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणाऱ्या वाक्यातील क्रियापदाचा तृ.पु.ए.व. नामाच्या (१) लिंगाशी सुसंवाद होतो, (२) पर्यायाने (काही वेळा) लिंगाशी सुसंवाद होतो. या पर्यायी रचनांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
१.१ पर्याय १ : लिंगाशी सुसंवाद होतोसदर पर्याय सर्वेक्षणातील एकूण ३४ जिल्ह्यांपैकी १९ जिल्ह्यांमध्ये आढळला आहे. या पर्यायाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
कोल्हापूर | करवीर - गडमुडशिंगी व खुपिरे, शाहुवाडी - शाहुवाडी व खुटाळवाडी, कागल - गोरांबे व एकोंडी, चंदगड - चंदगड, तुडिये व कोदाळी, राधानगरी - सोन्याची शिरोळी, गडहिंग्लज - हेब्बाळ जलद्याळ व इंचनाळ |
सांगली | मिरज - सोनी व म्हैसाळ, शिराळा - पाचुंब्री व शिराळा (खुर्द) |
सातारा | खटाव - मांडवे, विसापूर व म्हासुर्णे, पाटण - म्हावशी व हेळवाक, सातारा - चाळकेवाडी व कोडोली, वाई - चिखली व पांडेवाडी |
सोलापूर | सोलापूर - रानमसले, डोणगाव व नांदनी, अक्कलकोट - कर्जाळ, सांगोले - हांगिर्गे, हातिद, सांगोले व कटफळ, बार्शी - गौडगाव व सौंदरे |
उस्मानाबाद | उस्मानाबाद - शिंगोली व कोंड, उमरगा - जकेकूर व कसगी |
लातूर | लातूर - पाखरसांगवी, तांदुळजा व बाभळगाव, निलंगा - दादगी व मानेजवळगा, उदगीर - शिरोळ जानापूर व मलकापूर |
नांदेड | नांदेड - लिंबगाव व पांगरी, किनवट - इस्लापूर, मुखेड - हळणी |
परभणी | पालम - बनवस, सोनपेठ - तिवठणा, परभणी - टाकळगव्हाण |
बीड | बीड - बेडूकवाडी व कोल्हारवाडी, शिरूर-कासार - दहिवंडी, आंबेजोगाई - सातेफळ व दरडवाडी |
जालना | जालना - धावेडी, मंठा - उसवद व तळणी व केंधळीी |
औरंगाबाद | औरंगाबाद - भिकापूर-नायगाव व पिंपळखुंटा, वैजापूर - नांदगाव व सावखेडगंगा, पैठण - तेलवाडी व पाचोड (बुद्रुक), सोयगाव - घोसला व पळसखेडा |
जळगाव | जळगाव - धामणगाव, जामनेर - वाघारी, रावेर - मांगलवाडी |
नाशिक | नाशिक - मडसांगवी, पळसे व विल्होळी, सटाणा - मुल्हेर, सुरगणा - काठीपाडा व सुरगाणा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी व झारवड (खुर्द), येवला - बोकटे व निमगावमढ |
अहमदनगर | अकोले - ब्राह्मणवाडा व डोंगरगाव, नेवासा - खलालपिंपरी व मोरगव्हाण, अहमदनगर - कामरगाव व नारायण डोहो , जामखेड - सावरगाव व जवळके |
पुणे | हवेली - जांभळी व केसनंद, इंदापूर - सराफवाडी व सरडेवाडी, जुन्नर - बोरी (बुद्रुक) व धामणखेल, मुळशी - कासार-आंबोली व निवे |
पालघर | वसई - सायवन, डहाणू - मुरबाड व पिंपळशेत, जव्हार - हातेरी व खंबाळा, मोखाडा - दांडवळ व कारेगाव |
ठाणे | अंबरनाथ - वांगणी, भिवंडी - भिवाली व खोणी, मुरबाड - मढ व पाटगाव, शहापूर - बोरशेती-कळंबे व चौंढे (बुद्रुक), ठाणे - येऊर |
रायगड | कर्जत - गौळवाडी, अलीबाग - बापळे व मांडवा-बोडनी, रोहा - नागोठणे व चिंचवली, श्रीवर्धन - श्रीवर्धन, महाड - नरवण |
रत्नागिरी | रत्नागिरी - मालगुंड, झाडगाव व सोमेश्वर, खेड - सवणस, जामगे व बहिरवली, दापोली - दाभोळ व पालगड, राजापूर - मंद्रूळ व सोलगाव |
सदर पर्यायी रचना सर्वेक्षणातील एकूण ३४ पैकी २६ जिल्ह्यामध्ये आढळली आहे. या पर्यायी रचनेचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
चंद्रपूर | चंद्रपूर - चकनिंबाळा व दाताळा, राजुरा - कढोली (बुद्रुक) व कोष्टाळा, ब्रह्मपुरी - पांचवाव व तोरगाव (बुद्रुक) |
गडचिरोली | गडचिरोली - खुर्सा व शिवणी, कोरची - बोरी व मोहगाव |
गोंदिया | गोंदिया - टेमनी व कासा-तेढवा, सडक अर्जुनी - डुग्गीपार व चिखली |
भंडारा | भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी व बोरी |
नागपूर | नागपूर - येरला व सोनेगाव (लोधी), भिवापूर - सावरगाव व बोटेझरी, रामटेक - भोजापूर व करवाही, नरखेड - उमरी व पांढरी |
वर्धा | वर्धा - करंजी (भोगे) व निमगाव (सबने), आष्टी - खडका व थार, हिंगणघाट - अजंती व पोती, सेलू - वडगाव जंगली व झडशी |
यवतमाळ | घाटंजी - खापरी व कुर्ली, नेर - कोलुरा व दगड धानोरा |
अमरावती | अमरावती - सावर्डी व मलकापूर, वरूड - सातनूर व गाडेगाव, दर्यापूर - भांबोरा, जितापूर व भामोद, धारणी - कावडाझिरी |
अकोला | अकोला - गोपाळखेड व येवता |
वाशिम | वाशिम - शिरपूटी, रिसोड - चाकोली व घोणसर, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक) |
हिंगोली | हिंगोली - कारवाडी, कळमनुरी - बाभळी व मोरवड |
नांदेड | किनवट - मारेगाव (खालचे), मुखेड - शिरूर (दबडे), देगलूर - खानापूर व रमतापूर |
परभणी | पालम - कापसी, सोनपेठ - डिघोळ |
बीड | शिरूर-कासार - टाकळवाडी |
सोलापूर | अक्कलकोट - कुरनूर व चिक्केहळ्ळी |
बुलढाणा | बुलढाणा - पळसखेड भट व वरवंड, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ |
जळगाव | जळगाव - वडली, जामनेर - वाकोद, रावेर - निरूळ, चाळीसगाव - हातले व दहिवद, चोपडा - तांदळवाडी व वैजापूर |
धुळे | धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व शिरूड-खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा |
नाशिक | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव |
पालघर | वसई - वाघोली, कळंब व निर्मळ, डहाणू - बोर्डी व वेती, तलासरी - उधवा |
ठाणे | अंबरनाथ - उसाटणे |
रायगड | कर्जत - साळोख, मुरूड - एकदरा व चिंचघर, श्रीवर्धन - बागमांडला |
रत्नागिरी | राजापूर - कुंभवडे |
सिंधुदुर्ग | दोडामार्ग - आयी व माटणे, मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - आम्रड, मानगाव व कुडाळ, वेंगुर्ला - वेंगुर्ला, देवगड - तारामुंबरी व जामसंडे, वैभववाडी - नादवडे, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे |
कोल्हापूरी | राधानगरी - ओलवण |