मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

भूतकालवाचक धातूसाधित विशेषण

Download भूतकालवाचक धातूसाधित विशेषण
भूतकालवाचक धातूसाधित विशेषण
नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारांवारीतेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

पूर्ण क्रियाव्याप्ती (वर्तमान/भूतकाळ) या व्याकरणिक विशेषावरील नोंदीत [-एल्] या रूपाचा क्रियापदात्मक/विधेयात्मक वापर पर्यायी रूप २ म्हणून नोंदवला गेला आहे. प्रस्तुत नोंदीत [-एल्] या रूपाचे मराठीच्या काही विशिष्ट प्रादेशिक आणि सामाजिक बोलींमध्ये आढळणार्‍या विशेषणात्मक कार्याचे वर्णन नोंदवले आहे. ‘[-आल्]/[इल्]/[एल्-]’ हा प्रत्यय पूर्ण भूतकालवाचक तसेच धातूसाधित म्हणून सिंधी, माइया (वायव्येकडील भाषा), गुजराती, भिली, मराठी, कोकणी, खानदेशी (अहिराणी), हळबीच्या काही बोली त्याचप्रमाणे पूर्वेकडील भाषांमध्ये आढळतो, हे निरीक्षण साऊथवर्थ यांनी नोंदवले आहे (२००५: १३२).


काही उदाहरणे :
सिंधी धोत्-आल्-आ कपरा ‘धुतलेले कापड’ गुजराती लाख्-एल्-ओ पत्र ‘लिहिलेले पत्र’ भिली पिक्-न्-एल् ‘पिकलेले’, कुन्-न्-एल ‘कुजलेला’ प्राचीन मराठी तुट्-आल-इ साऊली ‘तुटलेली सावली’ मराठी केल्-एल्-ए काम ‘केलेले काम’ खानदेशी कर्-एल् काम ‘केलेले काम’ कोकणी पिक्-आल्ल्-ओ आम्बे ‘पिकलेले आंबे’ (पाहा साऊथवर्थ २००५: १३२) १.0 व्याकरणिक विशेषाची नोंद

मराठीच्या बोलींच्या सदर सर्वेक्षणात उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये [-एल्] या रूपाचा भूतकालवाचक धातूसाधित विशेषण या कार्यासाठी वापर आढळला आहे : अकोला, बुलढाणा, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर. [-एल्] या व्याकरणिक विशेषाच्या भौगोलिक आणि सामाजिक प्रसाराविषयी माहिती व उदाहरणे पुढे दिली आहेत :


जिल्हा तालुका व गाव
अकोला अकोला - गोपालखेड (कुणबी समाज) व येवता (बौद्ध समाज)
बुलढाणा बुलढाणा - पळसखेड भट (राजपूत समाज), जळगाव-जामोद - निमकराड (पाटील समाज), शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ
जालना जालना - धावेडी - मराठा
जळगाव जळगाव - धामणगाव व वडली
धुळे धुळे - खेडे, शिरपूर - आंबे, साक्री - धाडणे
नंदुरबार नंदुरबार - धानोरा
नाशिक सटाणा - दरेगाव, त्र्यंबकेश्वर - गोलदरी व झारवड (खुर्द)
पालघर जव्हार - हातेरी (वारली समाज)


१.१ उदाहरण (जिल्हा बुलढाणा, तालुका जळगाव-जामोद, गाव निमकराड, पु३७, पाटील, ४थी)
शिकेल मानुस जास्तं बोलत नी
šikel manus ǰastə bolət ni
šik-el manus ǰastə bol-ət ni
learn-PST.PTPL man more speak-IPFV NEG
An educated person does not talk much.
१.२ उदाहरण (जिल्हा बुलढाणा, तालुका शेगाव, गाव पाडसूळ, स्त्री३४, बौद्ध, ९वी)
मरेल लोकं मंग त्यायच्यान भेव लागते
mərel lokə məṅɡ tyayčan bʰew laɡte
mər-el lokə məṅɡ tyay-č-a-n bʰew laɡ-t-e
die-PST.PTPL people then it.OBL-GEN-OBL-INS fear.3SGF attach-IPFV-3SGF
(I am) afraid of dead people.
१.३ उदाहरण (जिल्हा बुलढाणा, तालुका बुलढाणा, गाव पळसखेड भाट, स्त्री५०+, राजपूत, अशिक्षित)
तवा मंग आता काइ राहेल काम करावे लागतात ताई माले
təwa məṅɡ ata kai rahel kam kərawe laɡtat tai male
təwa məṅɡ ata kai rah-el kam kər-awe laɡ-t-at tai ma-le
then then now some stay-PST.PTPL work do-OBLG attach-IPFV-3PL sister I.OBL-DAT
Then I have to do the remaining work.
संदर्भ
साऊथवर्थ, एफ. (२००५). लिंग्विस्टिक आर्किओलोजी ऑफ साऊथ एशिया. लंडन : रुटलेज.