नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘बायकोचा मोठा भाऊ’ आणि ‘बायकोचा धाकटा भाऊ’ या दोन नातेसंबंधांकरिता महाराष्ट्रातील विविध प्रदेशात खालीलप्रमाणे शब्दवैविध्य आढळून येते. म्हेवना, मेव्हने, मेव्हना, म्हेवने, भाऊजी, मेवनं, मेवना, मेव्हणा, मेवनो, साडू, मेवने, मेहुना, म्हेऊना, साला, दाजी, मेहुने, मेंव्हना, मेव्हनं, मेव्हना, मेव्हुना, मामा, पाहुने, लाहान मिवने, मोठे मिवने, धाकला मेवना, मोटा मेवना, बारका मेवना, मोट्टा मेवना, मेव्हुनं, मेहनास, मेहवना, मेहना, मेहुनो, मेहुनज़ानु, मेऊना, मिवनो, मिवना, मिवुना, म्हेवनो, मेहुनो, मिहुना, साळू, धाकटो म्हेवनो, मोथो म्हेवनो, सालेसाब, मेव्हणो, मेवणा, भावजी, चाचा, काका, म्हेवनोस, साले, मेऊने, भाऊज़ास, मिहीनास, भाव, मिनस, मेव्हेने, मेवणे, साळा, मेहनस, मिहणास, मिनास, मिहनास, मिहीनासीस, सोयरे, मिहीनीस, मेवनोस, कुयाद, म्हेव्हणा, मेव्हणुस, भावो, मेहवने, मेवहने, लाहान मेवना, मेव्हे, हारो, मेहना, साडा, भाऊ, मोठा मेव्हना, हाळा, मेव्हनास, मेहुनं, म्हेवनं, भावं, भावड, मेव्हनो, भावाडं, भावाडा, मेहनवाळी, मेहना, दाज़ी, मेहनो, भावस, हारा, हाला, मेव्हनस, भावा, लानो हाळो, बोठो हाळो, हाळो, सोयरा, धाकटा मेवना, थोरला मेवना, साळो, म्हेवनाले, मेव्हणाले, मेहुणा, साडभाऊ, मेव्हनारे, साळे, शालक, पाव्हना, सालाजी, सारे, मेहनवळी, मेवणे, मेहनवाळ, शालाक, जवाई, सारो, सालक, हालो, साला बहिनोई, बयनोई, पावना, जिजाज़ी, साले बहिनोई, भेहनोयी, साया, भावसासरा, भावसासरे, भाऊसासरा, बोवा, पावने, ज़वई, ज़ावाई, बापु, साळा भाऊ, सावा, बुवा, साये, बावा, आबा, मोटाजी, बाबा, ससरा, साळभाऊ, साय भाटवा, सालाळी, भाऊसासरे, भयिंला, ज़वाई, सासरा, साळे भाटवे, भावसासाळा, भाच़रा, भाटवा, भासरा, भाऊकासासरा, लहान साळा, मोठा साळा, साळं, भाऊसाहेब, साडे म्हेवने, म्हेवने बोवाजी, भावस सासरा, सोहर्या, आकड सासरा, जेट सारा, जेठ साळा, जेठ सारा, ज़ेठं साळा, लहान साळा, साडो, बोआ, सारा, तडामुड्याल, मोठा सारा, बडे साळा, बडे सारा, डेडसारा, डेडसाला, डेडसाळा, बडा साला, ल्हान साला, बडा सारा, साळेभाऊ, भाटवं, ज़ावय, साटभाऊ. मेव्हणा बायकोचा मोठा भाऊ आणि बायकोचा धाकटा भावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. म्हेवना, मेव्हने, मेव्हना, म्हेवने, मेवनं, मेवना, म्हेवनं, मेव्हणा, मेवनो, मेवने, मेहुना, म्हेऊना, मेहुने, मेंव्हना, मेव्हना, मेव्हुना, लाहान मिवने, मोठे मिवने, धाकला मेवना, मोटा मेवना, बारका मेवना, मोट्टा मेवना, मेव्हुनं, मेहनास, मेहवना, मेहना, मेहुनो, मेहुनज़ानु, मेऊना, मिवनो, मिवना, मेवुना, म्हेवनो, मेहुनो, मिहुना, धाकटो म्हेवनो, मोथो म्हेवनो, मेहुणा, मिहीनास, मिनस, मेव्हेने, मेवणे, मेहनस, मिहणास, मिनास, मिहनास, मिहीनासीस, मिहीनीस, मेवनोस, म्हेव्हणा, मेव्हणुस, मेहवने, मेवहने, लाहान मेवना, मेव्हे, मेहना, मोठा मेव्हना, मेव्हनास, मेहुनं, म्हेवनं, मेव्हनो, मेहनवाळी, मेहना, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तसेच लाहान मिवने, मोठे मिवने हे शब्द सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर या गावात आढळून आले आहेत. तसेच मेवनो हा शब्द कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात आढळून आलेला आहे. मिनास हा शब्द रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गौळवाडी या गावातील कातकरी समाजात मिळाला आहे. मिनस, मिहीनास, मिहणास, मिनास, मिहनास, मिहीनासीस, मिहीनीस हे शब्द रायगड, पालघर या भौगोलिक प्रदेशातील आदिवासी समाजात आढळून येतात. बायकोचा मोठा भाऊ आणि बायकोचा धाकटा भाऊ यासाठी भाऊजी हा शब्द पालघर, ठाणे, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये आढळून येतो. तसेच भाऊजी या शब्दाचे भावजी, भाऊज़ास, भाव, भावं, भावड, भावाडं, भावो, भावा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. साला हा शब्द बायकोचा मोठा भाऊ आणि बायकोचा धाकटा भाऊ यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. सालेसाब, साले, साळा, साडा, साळे, सालाजी, साळाभाऊ, साळभाऊ, लहान साळा, मोठा साळा, साळं, सालाळी, जेटसारा, जेठसाळा, जेठ सारा, ज़ेठं साळा, साडो, डेडसारा, डेडसाला, डेडसाळा, बडा साला, ल्हान साला, बडा सारा, साळेभाऊ, साळू इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तसेच डेडसारा, डेडसाला, डेडसाळा हे शब्द गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतात. हारा, हाला, लानो हाळो, बोठो हाळो, हाळो, हालो इ. शब्द नंदुरबार, पालघर या जिल्ह्यांमध्ये आढळून येतात. तर शालक, शालाक, सालक हे शब्द उत्तर महाराष्ट्रात आढळून येतात.