नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘नव्या पद्धतीच्या दारांना लावायची कडी‘ या संकल्पनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कडी, कडीकोयंडा हे शब्द सर्वसाधारणपणे आढळून येतात. ह्यामध्ये भौगोलिक तसेच ध्वनी वैविध्यानुसार पुढीलप्रमाणे शब्द आढळून येतात. कडी, कडीकोयंडा, कडीकोंडा, कुंडी, आडणी, आडकी, कोयंडा, आडना, आडकाना, किली, आडनो, आढो, आडनीन, अडाव, खिळी, कोंडो, कोंडा, कडीकोंडका, खीळ, करी, टापरा, किलीप, खिल्ली, खिली, सडा, चावी, बिजागरी, कुंडी, खोन्ड्या, कोडी, कोंडी, हान्ड्राप, कोएंडा, खिटी, क्वायंडा, कोंडका, हुक, टीचूकनी, इंगळ, गुंडी, कब्जी, काब्जा, साकडी, कुलापा, आडची, करी, करची, कडची, कोंडे, अडेगळी, कवड, बिजागडी, दांडू, कुलाबा, कुलाबी, साक्री, साकडी, कडोकोंडो, शटल, साकयी, सटकनी, टुचूकनी, साकळीकोंडा, हुक, साखळी, बिजाक्री, इंजीस, साकरकोंडा, गुजर, कुलूप, इंगल, सांकळी, लाक, साखरी, टीचकनी, लॉक, सांकल, हंगल, इत्यादी. कडीच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे, कडी ज्या साहित्यापासून तयार होते त्या साहित्याच्या नावावरून या संकल्पनेतसुद्धा वैविध्य आढळते. साखळी, खिळी, हुक यांचा वापर केलेली कडी, तर इंग्रजीच्या प्रभावाने लॉक, हंड्ल, इंजेस यांचा वापर दिसून येतो.